BMW New Car : BMWची पहिली इलेक्ट्रिक कार लवकरच होणार लाँच; जबरदस्त बॅटरीसह पावरफुल रेंज,किंमत पाहा

BMW iX1 Electric SUV : कंपनी आता नवीन इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे.
BMW iX1 Electric SUV
BMW iX1 Electric SUVSaam Tv
Published On: 

BMW iX1 electric SUV Prize And Features

बीएमडब्ल्यू ही कार उत्पादनातील सर्वोत्कृष्ट कंपनी आहे. कंपनी आता नवीन इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे. कंपनीने या कारची अधिकृतपणे माहिती दिली आहे. बीएमडब्ल्यू २८ सप्टेंबरला बाजारात नवीन ix1 इलेक्ट्रिक एसयूवी लाँच करणार आहे. कंपनीच्या या नवीन इलेक्ट्रिक कारची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

कंपनीने याबाबात एक्स(ट्विटर) अकाउंटवरुन माहिती दिली आहे. कंपनीने या कारचा एक टीझर सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. २८ सप्टेंबरला पहिली इलेक्ट्रिक कार लाँच करण्यास सज्ज आहोत अशी माहिती देली आहे.

BMW iX1 Electric SUV
Facebook : फेसबुकचं नवीन अपडेट! एकाचवेळी बनवता येणार चार वेगवेगळे प्रोफाईल

BMW ix1 बॅटरी आणि रेंज

BMW ix1 इलेक्ट्रिक एसयूवीमध्ये 64.7kWh ची लिथियम-आयन बॅटरी वापरली आहे. ही बॅटरी 313bhp पावर आणि 494Nm पीक टॉर्क जनरेट करु शकते. ही नवीन कार 438 किलोमीटरची रेंज देण्यास सक्षम आहे. ही कार येत्या २८ तारखेला लाँच होणार आहे. याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.

किंमत

BMW ix1 हा थर्ड जनरेशन x1 चा व्हेरियंट आहे. एका रिपोर्टनुसार, ही कार xDrive30 या व्हेरियंटसह 60 ते 65 लाख रुपयांत लाँच केली जाऊ शकते. या कारची किंमती अद्याप अधिकृतपणे जाहीर केलेली नाही.

BMW iX1 Electric SUV
Investment Tips : फक्त बचत खात्यात पैसे ठेवण्यापेक्षा गुंतवणुकीसाठी हे अनेक पर्याय फायदेशीर, जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com