Christmas मध्ये केक-कुकीज खाऊन Blood Sugar वाढली? Diabetes च्या रुग्णांनी हा उपाय करुन पाहाच

Diabetes Control Tips : ख्रिसमस आणि आता नवीन वर्ष साजरे करणार, त्यात सुट्टीचा आनंदच आनंद सुरू झाला आहे. फेस्टिव्हलचा काळ म्हणजे खाण्याचा, पिण्याचा आणि आनंद घेण्याचा काळ असतो. याच वेळी आपण आरोग्याकडे दुर्लक्ष करतो.
Diabetes Control Tips
Diabetes Control TipsSaam Tv
Published On

Diabetes :

ख्रिसमस आणि आता नवीन वर्ष साजरे करणार, त्यात सुट्टीचा आनंदच आनंद सुरू झाला आहे. फेस्टिव्हलचा काळ म्हणजे खाण्याचा, पिण्याचा आणि आनंद घेण्याचा काळ असतो. याच वेळी आपण आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. विशेषत: ज्यांना मधुमेह आहे त्यांनी ख्रिसमस (Christmas) आणि नवीन वर्षात अतिरिक्त सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो.

क्लासिक ख्रिसमस डिश, केक आणि कुकीजमुळे साखरेची पातळी झपाट्याने वाढण्याचा धोका आहे, म्हणून तुम्ही खाद्यपदार्थांच्या निवडीबाबत काळजी घ्यावी.

केक, कुकीज आणि गोड पदार्थांमध्ये साखर (Sugar) आणि सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढू शकते. या फेस्टिव्हलच्या काळात तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयींसोबत इतर काही गोष्टींची काळजी घेऊन डायबेटिज नियंत्रणात ठेवू शकता.

Diabetes Control Tips
Diabetes News: मधुमेहींनो डार्क चॉक्लेट खाताय? आरोग्याला आहे फायदेशीर, जाणून घ्या

रक्तातील साखर वाचत रहा

आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सणांच्या काळात तुमची शारीरिक हालचाल सामान्यपेक्षा कमी होते किंवा दिनचर्येतील बदलांमुळे तुमच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी सामान्यपेक्षा जास्त होते. याशिवाय लोक खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये निष्काळजीपणा करतात. जास्त मीठ किंवा मिठाईचे सेवन यामुळे गुंतागुंत वाढू शकते. त्यामुळे सर्व खबरदारी घेणे आणि रक्तातील साखरेचे प्रमाण वेळोवेळी घेत राहणे गरजेचे आहे. जर साखर वाढत असेल तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण कमी करा

तुम्हाला ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये केक किंवा मिठाई खायची असेल तर तुमच्या आहारातून इतर कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थांचे सेवन पूर्णपणे कमी करा. जर रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असेल तर केक, कुकीज आणि गोड पदार्थांपासून दूर रहा. साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारासोबतच दैनंदिन दिनचर्या योग्य राखणे अत्यंत आवश्यक आहे.

Diabetes Control Tips
Diabetes and Almonds: बदाम खाण्याची योग्य पद्धत कोणती? जाणून घ्या

शारीरिकरित्या सक्रिय राहा

फेस्टिव्हलच्या काळात साखरेचे प्रमाण वाढण्यामागे शारीरिक निष्क्रियता हे प्रमुख कारण मानले जाते. वर्षाच्या या वेळी लोकांना सुट्टीत आराम करायला आवडते, परंतु मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित व्यायामासाठी वेळ काढणे महत्त्वाचे आहे. शारीरिकरित्या सक्रिय राहिल्याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी, रक्तदाब आणि रक्तातील चरबीचे प्रमाण नियंत्रित करण्यात मदत होऊ शकते. चालणे किंवा हलके घरगुती व्यायाम देखील तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

Diabetes Control Tips
Diabetes च्या रुग्णांनो या पद्धतीने पाणी पिताय? कधीच राहाणार नाही Blood Sugar नियंत्रणात

पेय पदार्थांची काळजी घ्या

ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये काही लोक मद्यपान करतात, पण मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे खूप त्रासदायक ठरू शकते, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अल्कोहोल असो वा गोड आणि शीतपेये, ते साखरेची पातळी झपाट्याने वाढवतात. त्याऐवजी तुम्ही फळांचे रस किंवा साखर नसलेली पेये घेऊ शकता. मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी हे उपाय आवश्यक आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com