बिल गेट्स यांच्या कंपनीमुळे Instagram ची धाकधूक वाढली; नवीन फीचर तरुणांना करणार आकर्षित

Online Short Video : सध्या लिंक्डइन कंपनी टिक-टॉक, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर दाखवल्या जाणाऱ्या व्हिडीओ फीडवर काम करते आहे. लिंक्डइनवर असणाऱ्या या शॉर्ट व्हिडिओ फीचरमध्ये तुम्हाला अनेक खास फीचर्स मिळतील. जे इतर अॅप्सपेक्षा वेगळे असणार आहे.
LinkedIn Launch New Features
LinkedIn Launch New FeaturesSaam Tv

LinkedIn Launch New Features :

लिंक्डइन हे नोकरी शोधण्यासाठी प्रोफेशनल प्लॅटफॉर्म मानले जाते. या ठिकाणी जगभरातील कंपन्यांमधील नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. ज्यामध्ये तुम्ही नोकरीसाठी अर्ज करु शकता.

बिल गेट्सची ही कंपनी सध्या लिंक्डइन कंपनी टिक-टॉक, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर दाखवल्या जाणाऱ्या व्हिडीओ (Video) फीडवर काम करते आहे. लिंक्डइनवर असणाऱ्या या शॉर्ट व्हिडिओ फीचरमध्ये तुम्हाला अनेक खास फीचर्स मिळतील. जे इतर अॅप्सपेक्षा (Application) वेगळे असणार आहे.

लिंक्डइनच्या या फीचरमध्ये तुम्हाला करिअर आणि व्यावसायिक विषय अगदी सहज सेट करता येऊ शकतील. यामध्ये अनेक नवीन व्हिडिओ पाहाता येणार आहे. ज्यामुळे नोकरी मिळवणे अधिक सोपे होईल असे कंपनीचे म्हणणे आहे.

LinkedIn Launch New Features
Samsung Smartphone : भारतीय युजर्ससाठी आनंदाची बातमी! सॅमसंग लवकरच लॉन्च करणार AI आणि हायपर कनेक्टीव्हिटी

इन्स्टाग्राम (Instagram), युट्यूब, स्नॅपचॅट आणि नेटफ्लिक्सवरही अनेक फीचर्स देण्यात आले आहे. टिकटॉकच्या शॉर्ट फॉर्म व्हिडीओमधील गोष्टी पाहून हा निर्णय घेण्यात आला आहे. हल्ली व्हिडीओचा कंटेंट लोकांपर्यंत अधिक प्रमाणात पोहोचतो. याचाच विचार करुन कंपनीने करिअरच्या वाढीपासून व्यावसायिक कौशल्यांपर्यंत सर्व माहिती सहज मिळेल.

हे फिचर लिंक्डइनवर लाईव्ह केले जाणार आहे. यासाठी तुम्हाला ऑनलाइन सल्ला देखील मिळेल. यामध्ये तुम्हाला करिअरची वाढ, नोकरी शोधणे आणि तुमचा व्यवसाय आणखी पुढे कसा नेता येईल याबद्दल माहिती मिळेल. येत्या काळात नवीन व्यवसाय करणाऱ्यांना नवे व्यासपीठही मिळणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com