किल्ला हा महाराष्ट्राची शान आहे. प्रत्येक किल्ल्यावर एक इतिहास घडलेला आहे. किल्ले (Fort ) हे इतिहासाची अनुभूती करून देतात. किल्ल्यांचे संरक्षण आणि संवर्धन प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे. तुम्ही जर मित्रमंडळींसोबत किल्ले फिरायला किंवा ट्रेकिंग करायला जाण्याचा प्लान करत असाल तर मुंबई जवळील या किल्ल्यांना आवश्य भेट द्या. हे किल्ले निसर्गाच्या सानिध्यात लपलेले आहेत. मुंबईजवळ असलेले पालघर (Palghar) आणि डहाणू (Dahanu ) येथे हे सर्व किल्ले आहेत. तुम्ही वेस्टन लाइनच्या रेल्वेने डहाणू ट्रेन पकडून येथील किल्ल्यांवर भटकंती करू शकता.
शिरगाव किल्ला हा पालघर तालुक्यात येतो. हा किल्ला समुद्र किनारी एका बाजूला आहे. या किल्ल्याचा उपयोग छत्रपती शिवाजी महाराज यांनी समुद्रातून येणाऱ्या शत्रूवरती लक्ष ठेवण्यासाठी केला होता. या किल्ल्यावर तुम्हाला स्वच्छता पाहायला मिळेल. तसेच या किल्ल्यावर पाम वृक्षाचे झाड आहेत. या किल्ल्याची तटबंदी आजही भक्कम आहे.
कालदुर्ग किल्ला पालघर मधील डोंगराळ किल्ला आहे. कालदुर्ग किल्ला आयताकृती आहे. जो लांबून खूप स्पष्ट दिसतो. येथे तुम्हाला वेगवेगळ्या जातीची झाडे पाहायला मिळतील.
तारापूर किल्ल्याच्या आत विहिर आणि सुंदर बाग पाहायला मिळेल. तारापूर किल्ला पालघर मधील बोईसर गावात येतो. चिमाजी आप्पांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी हा किल्ला जिंकला.
पालघर तालुक्यात केळवा किल्ला येतो. हा किल्ला शांत, सुंदर आणि स्वच्छ आहे. येथील वातावरण मनाला प्रसन्न करून टाकते. केळवा किल्ला चहूबाजूंनी पाण्याने वेढलेला आहे. तसेच येथे आजूबाजूच्या परिसरात अनेक सुरूची झाडे पाहायला मिळतील. येथे भरती - ओहोटीच्या वेळी निसर्गाचे अद्भुत सौंदर्य पाहायला मिळते.
पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात गंभीरगड किल्ला वसलेला आहे. गुजरात सीमेवर हा किल्ला आहे. येथे भरपूर वन्य वनस्पती पाहायला मिळतात. किल्ल्याजवळ देवीचे मंदिर देखील आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.