Sweet Corn Benefits: मक्याचे कणीस खा आणि निरोगी रहा; वाचा आश्चर्यकारक फायदे

Benefits of Makka: काही व्यक्तींना कणीस भाजून खाणे फार आवडते. आता तुम्हाला देखील मक्याचं कणीस आवडत असेल तर त्याचे काही फायदे सुद्धा जाणून घ्या.
Sweet Corn Benefits: मक्याचे कणीस खा आणि निरोगी रहा; वाचा आश्चर्यकारक फायदे
Sweet Corn BenefitsSaam TV

पावसाळा सुरू होताच बाजारात अनेक ठिकाणी मक्याचे कणीस विकण्यासाठी येते. मक्याचे कणीस आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. काही व्यक्तींना कणीस भाजून खाणे फार आवडते. आता तुम्हाला देखील मक्याचं कणीस आवडत असेल तर त्याचे काही फायदे सुद्धा जाणून घ्या.

Sweet Corn Benefits: मक्याचे कणीस खा आणि निरोगी रहा; वाचा आश्चर्यकारक फायदे
Immunity Booster Foods: पावसाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी 'या' गोष्टींचे सेवन करा

जास्त प्रमाणात प्रोटीन

मक्याचे कणीस खाल्ल्याने आपल्या शरीराला जास्त प्रमाणात व्हिटॅमिन आणि जीवनसत्व मिळतात. यामध्ये व्हिटॅमिन डी सी आणि बी सुद्धा असते. त्यामुळे ज्या व्यक्तींना या व्हिटॅमिनची कमतरता आहे त्यांनी हे कणीस खाल्ले पाहिजे.

वजन कमी होते

वजन कमी करण्यासाठी देखील कणीस फार फायदेशीर आहे. तुम्ही वजन कमी करताना फक्त भाज्या आणि बेचव जेवण खाऊन कंटाळले असाल तर आजपासून मक्याचे कणीस खाण्यास सुरुवात करा. तुम्ही ते कणीस नुसते शिजवून त्यावर मीठ मसाला टाकून सुद्धा खाऊ शकता. अशा पद्धतीने बनलेलं कणीस तुमचं वजन कमी करण्यासाठी मदत करेल.

गरोदरपणात उत्तम

गरोदर महिलांना आरोग्याच्या अनेक समस्या असतात. अनेकदा पोट साफ न होणे ही समस्या देखील होते. अशावेळी या महिलांनी आहारात मक्याचे कणीस खावे. यामध्ये फॉलीक ऍसिड असते त्याने गरोदर महिलांना फायदा होतो. तसेच बाळाच्या आरोग्यावर देखील याचा परिणाम होतो.

रोगप्रतिकार शक्ती वाढते

मक्याचे कणीस आपल्या आरोग्यासाठी उत्तम आहेच. यातील विविध घटकांमुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते. पावसाळ्यात विविध साथीचे आजार पसरतात. आजार पसरल्याने व्हायरल इन्फेक्शन देखील वाढते. त्यामुळे आहारात सतत मक्याचे कणीस खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती सुधारते.

आरोग्याच्या विविध समस्या असल्यास त्या व्यक्तींनी कायम आहारात मक्याच्या कणसाचा समावेश करावा. तुम्ही मक्याचे दाणे सुकवून त्याचे पीठ तयार करू शकता. तसेच या पिठाच्या भाकरी खाऊ शकता.

टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. साम टिव्ही या माहितीचे समर्थन करत नाही.

Sweet Corn Benefits: मक्याचे कणीस खा आणि निरोगी रहा; वाचा आश्चर्यकारक फायदे
Monsoon Special Foods: या पावसाळ्यात काहीतरी करा हटके; भाज्यांपासून बनवा कुरकुरीत भजी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com