Vay Vandana Card: ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘आरोग्य सुरक्षा कवच’; वय वंदना कार्डसाठी अर्ज कसा कराल? जाणून घ्या

Government Scheme Update: वय वंदना कार्डमुळे ज्येष्ठ नागरिकांना १० लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतात. ही योजना कॅशलेस असून सरकारी व खासगी रुग्णालयात लागू आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्ज प्रक्रिया उपलब्ध आहे.
Government Scheme Update
Vay Vandana Cardgoogle
Published On

वय झाल्यावर आपोआप आजारपणाच्या समस्या वाढतात. म्हातारपणात आजारी पडल्यावर आर्थिक मदत मिळावी, यासाठी सरकारने खास योजना राबवली आहे. केंद्र सरकारच्या वय वंदना योजनेत ज्येष्ठ नागरिकांना मदत केली जाते. त्यांना ५ लाखांपर्यंत मोफत उपचार दिले जातात.

आयुष्मान भारत योजना (Ayushman Bharat Vay Vandana Cards)

आयुष्मान भारत योजनेत नागरिकांना ५ लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतात. ज्येष्ठ नागरिकांना या योजनेत १० लाखांपर्यंतचा लाभ मिळू शकतो. गंभीर आजारासाठी १० लाखांपर्यंत मदत दिली जाते. यासाठी वय वंदना कार्ड तयार करावे लागते. ज्येष्ठ नागरिक वय वंदना कार्ड दाखवून १० लाखांपर्यंत मोफत उपचार घेऊ शकतात.

Government Scheme Update
Nagpur : नामांकित कॉलेजचा बोगस जात प्रमाणपत्र घोटाळा उघड, शिक्षक आणि विद्यार्थ्यांसह ११ जणांवर गुन्हा; नागपुरात खळबळ

तुम्ही या योजनेचा (Vay Vandana Card) लाभ कॅशलेस आणि पेपरलेस पद्धतीने घेता येतो. शासनमान्य सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये तुम्ही या कार्डाच्या आधारे उपचार घेऊ शकता. यामुळे जेष्ठ नागरिकांना आपात्कालीन परिस्थितीत याचा सगळ्यात जास्त फायदा घेता येतो.

एखाद्या व्यक्तीला ह्रदयविकार, कॅन्सर, मूत्रपिंड यांसारख्या जीवघेणे आजार असतील किंवा महागड्या शस्त्रक्रिया करायच्या असतील तर 'वय वंदना' योजना तुमच्यासाठी सगळ्यात सोयीस्कर ठरेल.

तुम्ही यासाठी ऑनलाईन पोर्टल किंवा अधिकृत अॅपच्या माध्यमातून आवश्यक कागदपत्रे अपलोड करुन घरबसल्या 'वय वंदना' कार्ड तयार शकता. तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने म्हणजेच महाआरोग्य शिबिर, प्राथमिक आरोग्य केंद्र, अधिकृत किऑस्क यांसारख्या ठिकाणाहून कार्ड काढता येऊ शकतं. याची माहिती तुम्हाला त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर सुद्धा मिळू शकते. याचा लाभ सगळ्याच नागरिकांनी घेतला पाहिजे. याबाबत अनेक ठिकाणी मोहीम राबवण्यात आली आहे. याने समाजातील अनेक वृद्धांना त्याचा लाभ घेता येईल अशी सगळ्यांनाच आशा आहे.

Government Scheme Update
Jio Recharge: खुशखबर! IPL पाहण्यासाठी भन्नाट ऑफर, Jioचा हा प्लॅन होतोय व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com