Summer Health: घामोळ्या, पुरळसारख्या समस्यांवर रामबाण उपाय; त्वाचेच्या सर्व समस्या होतील गायब

Ayurvedic Home Remedies For Itchy Skin Allergy: उन्हाळ्यात फणस, काजू, आंबा ही फळे प्रत्येक व्यक्ती खातो. ही फळे देखील उष्ण असल्याने अनेकांच्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात. तसेच शरीरावर लाल डाग येतात.
Ayurvedic Home Remedies For Itchy Skin Allergy
Summer HealthSaam TV

उष्णतेच्या लाटेमुळे सध्या सर्व नागरिक त्रस्त आहेत. उन्हामुळे गरम जास्त होत असल्याने आपल्या शरीरातील उष्णता देखील वाढत चालली आहे. त्यामुळे चेहऱ्यावर, अंगावर पुरळ येत आहेत. उष्णतेमुळे अनेकांना घामोळ्या देखील येतात. यावर वेळीच उपचार न केल्यास त्वचेच्या काही गंभीर समस्या होऊ शकतात.

Ayurvedic Home Remedies For Itchy Skin Allergy
Skin Care Tips: चेहऱ्यावर कोरियन ट्रिटमेंट सारखा ग्लो हवाय? मग मधासोबत 'या' गोष्टी अप्लाय करा

उन्हाळ्यात फणस, काजू, आंबा ही फळे प्रत्येक व्यक्ती खातो. ही फळे देखील उष्ण असल्याने अनेकांच्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात. तसेच शरीरावर लाल डाग येतात. आयुर्वेदिक पद्धतीने हे पुरळ तुम्ही घालवू शकता.

मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने त्वचेला जास्त खाज सुटते. अशावेळी आपल्याला स्वतःची अधिक काळजी घ्यावी लागते. त्यामुळे आज घामोळ्या जाण्यासाठी काय उपाय करावेत याची माहिती जाणून घेऊ.

कापूर आणि खोबऱ्याचे तेल

कापूर बारीक टेचून घ्या. त्यानंतर खोबरेल तेलात हा कपूर भिजत ठेवा. त्यानंतर तेल गळून घ्या. हे तेल तुम्ही तुमच्या त्वचेवर लावल्यास खाज, पुरळ आणि घामोळ्या या समस्या दूर होतात. खोबरेल तेलामध्ये अँटी बायोटिक असते. त्यामुळे त्वचेच्या अन्य समस्या देखील लगेचच नाहीश्या होतात.

तुळशीची पाने

तुळशीची पाने देखील त्वचेच्या समस्येसाठी फायदेशीर आहेत. यामध्ये अँटी इंफ्लेमेटरी असते. त्यामुळे तुम्ही तुळशीच्या पानांचे सेवन करू शकता. तसेच तुळशीच्या पानांना हातावर कुस्करून त्याचा येणारा रस चेहऱ्यावर लावू शकता. याने चेहऱ्यावर येणारी खाज तसेच त्वचेवरील खाज येणे बंद होते.

बर्फाचा तुकडा

उष्णता जास्त वाढल्याने त्वचेवर पुरळ आले असतील तर खाज सुटते. जास्त खाजवल्याने कधी कधी त्वचेवर जखमा होतात. त्यामुळे कोणतेही क्रीम किंवा अन्य रामबाण उपाय करताना त्वचा आणखी जळते. त्यामुळे अशावेळी तुम्ही चेहऱ्यावर आणि त्वचेवर आईस क्यूब म्हणजेच बर्फाचे तुकडे फरवावेत. त्याने थंडावा मिळतो आणि त्वचेला होणारी आग कमी होण्यास मदत होते.

ताक

तुम्हाला त्वचेच्या काही समस्या असतील तर थंड पदार्थांचे सेवन करण्यास सुरुवात करा. ताक आपल्या आरोग्यासाठी फार फायदेशीर आहे. दररोज ताप पिल्याने पोटात थंडावा राहतो. तसेच पचन क्रिया सुधारते. त्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स देखील येत नाहीत.

उन्हाळ्यात येणाऱ्या उष्णतेपासून आपला बचाव व्हावा म्हणून हे काही घरगुती उपाय आहेत. तुम्ही देखील हे उपाय घरी ट्राय करू शकता.

टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. या टीप्सने पुरळ तसेच घामोळ्या येण्याच्या समस्या कायमचा दूर होतील असा दावा साम टीव्ही करत नाही.

Ayurvedic Home Remedies For Itchy Skin Allergy
Summer Skin Care: या घरगुती उपायांनी होईल काळी त्वचा गोरी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com