Manasvi Choudhary
पपई लावल्याने चेहऱ्यावर चमक येते. पपईचा एक तुकडा किसून त्याची पेस्ट तयार चेहऱ्यावर लावावी. एक तासाने चेहरा धुवावा परिणाम दिसेल.
नारळाचे पाणी चेहऱ्यावर दिवसातून दोन वेळा लावल्याने चेहऱ्यावरील डाग आणि सूरकुत्या कमी होतील.
पिकलेली केळी पाण्यात मिक्स करून घ्यावी. ते मिश्रण चेहऱ्यावर लावून २०-२५ मिनिटे ठेवावे. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा.
गुलाब पाणी दुधात मिक्स करून लावल्याने चेहरा उजळतो.
लिंबाच्या रसात साखर मिक्स करून चेहऱ्यावर स्क्रब केल्याने डेड स्किन निघून जाईल.
आंब्याची साल दुधात मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने त्वचा उजळेल.
डिस्क्लेमर:
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.