Lakshmi Pujan : 'या' चुकांमुळे धनलक्ष्मी प्रसन्न होत नाही; वाचा आणि पूजा करताना लक्षात ठेवा

Avoid this Mistake on Lakshmi Pujan : लक्ष्मीपुजनाच्या दिवशी काही महत्वाच्या चुका टाळणे गरजेचे आहे. या चुका केल्याने व्यक्तीच्या आयुष्यातील धनसंपत्ती आधीपेक्षा कमी होते.
Avoid this Mistake on Lakshmi Pujan
Avoid this Mistake on Lakshmi PujanSaam TV
Published On

प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात भरभराट आणि धनसंपत्ती असावी असं वाटतं. त्यासाठी आज लक्ष्मीपुजनाच्या दिवशी प्रत्येक व्यक्ती घरी पूजा करतात. लक्ष्मी देवीची मनोभावे सेवा करतात. लक्ष्मी देवीला धन संपत्तीचे प्रतिक मानले जाते. त्यामुळे या दिवशी घरात लक्ष्मीपुजनाचा जल्लोष पहायला मिळतो.

Avoid this Mistake on Lakshmi Pujan
Diwali 2024 : लक्ष्मीपूजनच्या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या करू नयेत? वाचा सविस्तर

लक्ष्मीपुजन करताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात. नकळत आपल्या हातून काही चुका घडतात. त्या चुका टाळणे महत्वाचे आहे. काही ठरावीक चुकांमुळे धनलक्ष्मी नाराज होऊ शकते. तसेच त्या व्यक्तीच्या जीवनात भरभराट येत नाही. त्यामुळे अशा कोणत्या चुका आहेत ज्या लक्ष्मीपुजनाच्या दिवशी टाळाव्यात त्याची माहिती आज जाणून घेणार आहोत.

शिंकणे

देवी देवतांची पूजा करताना प्रत्येक व्यक्तीने आपल्या शिंकण्यावर आणि खोकल्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. पुजेच्यावेळी शिंक आल्यास तेथून थोडे दूर जाऊन शिंकावे. शिंकणे आणि खोकला या नैसर्गिक गोष्टी आहेत. कुणालाही यावर नियंत्रण ठेवता येत नाही. त्यामुळे तुम्ही शिंकलात किंवा खोकलात तर तोंड आणि हात स्वच्छ धुवून घ्यावे.

जांभई देणे

जांभई देणे म्हणजे आळस येणे. देवाचं नामस्मरण करताना असे करू नये. लक्ष्मी देवीची पूजा करताना आपलं मनापासून प्रसन्न राहिलं पाहिजे. तरच देवी देखील आपल्यावर प्रसन्न होते आणि घरात भरभराट घडवते.

रागवणे

काही व्यक्ती सतत गरज नसताना चिडचिड करतात. शिवाय कायम भांडणे देखील करतात. लक्ष्मी पुजनाच्या दिवशी असे करू नका. लक्ष्मी पुजन सुरू असताना भांडणे टाळा. मन शांत आणि आनंदी ठेवा. पूजा करताना ही चूक मुळीच करू नका.

रात्री अस्वच्छ ठेवणे

लक्ष्मी देवी ज्या ठिकाणी गरिबी आहे त्या ठिकाणी सर्वप्रथम आशीर्वाद देते. तसेच ज्या घरात संपत्तीची कदर केली जात नाही, सर्वत्र अस्वच्छता असते अशा ठिकाणी देवी जात नाही. शिवाय त्या ठिकाणी आणखी जास्त प्रमाणात धन संपत्ती कमी होत जाते.

Avoid this Mistake on Lakshmi Pujan
Lakshmi Pujan 2023 : दिवाळीच्या दिवशी चुकूनही देवी लक्ष्मीला अर्पण करु नका ही फुले, खिशात पैसाच राहणार नाही

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com