Mas Wadi Recipe: झणझणीत गावरान स्टाईल मासवडी कशी बनवायची; वाचा रेसिपी

Authentic Maharashtrian Recipe Mas Wadi Recipe: उद्याच्या रविवारी घरी काही तरी चमचमीत आणि झणझणीत खाण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक भन्नाट रेसिपी शोधली आहे.
Mas Wadi Recipe: झणझणीत गावरान स्टाईल मासवडी कशी बनवायची; वाचा रेसिपी
Mas Wadi RecipeSaam TV

मिसळ पाव, पाव भाजी हे पदार्थ अनेक घरांमध्ये सुट्टीच्या दिवशी बनवले जातात. सुट्टीचा दिवस म्हणजे एकतर बाहेर फिरण्याचा प्लान किंवा मग घरीच चमचमीत पदार्थ खाणे असा असतो. आता तुम्ही देखील उद्याच्या रविवारी घरी काही तरी चमचमीत आणि झणझणीत खाण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक भन्नाट रेसिपी शोधली आहे.

Mas Wadi Recipe: झणझणीत गावरान स्टाईल मासवडी कशी बनवायची; वाचा रेसिपी
Dhapate Recipe: नाश्त्याला बनवा पौष्टिक आणि स्वादिष्ट धपाटे; वाचा सिंपल रेसिपी

पश्चिम महाराष्ट्रात गावी प्रत्येक घराघरात मासवडी हा पदार्थ खाल्ला जातो. अतिशय झणझणीत आणि मऊ लुसलुशीत अशी मासवडी ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीसोबत फारच छान लागते. मासवडी बनवण्याची पद्धत थोडीशी कठीण आहे. मात्र संपूर्ण रेसिपी व्यवस्थित समजून घेतल्यास मासवडी सहज बनवता येते. त्यामुळे आज याच मासवडीची रेसिपी पाहणार आहोत.

साहित्य

मिरची जिरे लसूण यांचे वाटण दोन चमचे

एक कांदा

एक वाटी तीळ

एक वाटी शेंगदाणे

एक वाटी सुकं खोबरं

दोन चमचे धने

हळद

बेसन पीठ

कोथिंबीर

कृती

सुरुवातीला एक कढई गॅसवर ठेवा. त्यामध्ये शेंगदाणे भाजून घ्या. शेंगदाणे थोडे भाजल्यावर त्यात तीळ टाका. सुरुवातीलाच तिळ टाकू नका कारण ते लगेच जळून जातील. त्यानंतर थोडसं तेल टाकून यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि धने ऍड करा.

त्यानंतर यामध्ये मिरची लसूण आणि जिरे सुद्धा मिक्स करा. तेलात थोडसं परतून घेतल्यानंतर सुकं खोबरं देखील टाका. सर्व मिश्रण छान भाजल्यानंतर मिक्सरमध्ये घ्या. मिक्सरमध्ये सर्व मिश्रण अगदी पावडर होईपर्यंत बारीक करू नका. हे मिश्रण थोडेसे जाड ठेवा. तयार झालं मासवडीमधलं सारण.

पुढे बेसन बनवण्यासाठी एका कढईत पाणी ठेवा. या पाण्यामध्ये हळद आणि तेल मिक्स करा. पाण्याला उकळी आली की त्यामध्ये हळूहळू बेसन टाका. बेसन जास्त प्रमाणात घट्ट व्हायला नको तसेच जास्त पातळही राहायला नको याची काळजी घ्या. तेल टाकल्याने मासवडी बनवायला मदत होते.

आता मासवडी बनवण्यासाठी एक मोठी परात घ्या. यावर रेशमी किंवा सुती कापड भिजवून घ्या. भिजलेल्या कापडामध्ये गरम गरम बेसन पसरवा. त्यानंतर तुम्ही तयार केलेल्या सारण यामध्ये भरा. पुढे संपूर्ण बेसन गोल आकारात कापडावर वळून घ्या. त्यानंतर हाताने याला त्रिकोणी आकार द्या. या आकारामुळेच या पदार्थाला मासवडी म्हणतात.

कापडामध्ये तयार केलेला रोल अलगद हाताने एका प्लेटवर ठेवा. अशा पद्धतीने सर्व मिश्रणाचे आणि पिठाचे रोल करून घ्या. हे रोल थंड झाल्यावर याच्या बारीक चकत्या कापा. या चकत्या जास्त पातळ कापू नये. जाडसर चकत्या रस्त्याबरोबर खाताना छान लागतात.

रस्सा बनवण्यासाठी कृती

कांदा, टोमॅटो, आलं लसूण, खोबरं यांचं बारीक मिश्रण करून घ्या. मिक्सरला वाटलेल्या या मसाल्याला तेलाची फोडणी द्या. फोडणी देताना यामध्ये कांदा, घरातील सब्जी मसाला, एवरेस्टचा गरम मसाला देखील मिक्स करा. संपूर्ण मसाल्याला छान गरम होऊ द्या. मसाले गरम झाल्यावर आपोआप त्याला तेल सुटेल. त्यानंतर यामध्ये पाणी टाकून घ्या. पाण्याला छान उकळी येईपर्यंत वाट पहा. उकळी आल्यानंतर चवीनुसार मीठ तपासून पहा. तयार झाला तुमचा झणझणीत रस्सा.

जेवण वाढताना ताटात मासवडी आणि रस्सा वेगवेगळ्या. प्रत्येक जण आपल्या आवडीनुसार ही मासवडी आणि रस्सा खातात. मासवडी खाताना शक्यतो भाकरी सोबत खा. मासवडीचे जेवण झाल्यावर थंड ताक प्यायले पाहिजे. कारण मासवडीमध्ये सर्व गरम पदार्थ असतात. पचन व्यवस्थित व्हावे यासाठी ताक प्यावे.

Mas Wadi Recipe: झणझणीत गावरान स्टाईल मासवडी कशी बनवायची; वाचा रेसिपी
Palak Paneer Recipe: रेस्टॉरंट स्टाइल पालक पनीर घरीच बनवता येणार; वाचा रेसिपी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com