
फीट राहण्यासाठी आजकाल प्रत्येक जण त्याच्या परीने प्रयत्न करतो. अशातच जीमला जाणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे. मात्र अनेकांच्या मनात प्रश्न असतो तो जीम कधी सुरु करावं? मुळात जीम सुरू करण्यासाठी ठराविक वय असावं असं काही नाही. पण वयानुसार शरीराची क्षमता, उद्दिष्टं आणि व्यायाम पद्धती वेगवेगळी असते. योग्य मार्गदर्शन आणि शिस्तबद्ध सराव असल्यास कोणत्याही वयात जिम सुरू करता येऊ शकतो.
V LEGENDS GYM & MMA चे फिटनेस कोच आर्यन नास्कर यांना सांगितलं की, या वयात शरीराचा विकास सुरू असतो, त्यामुळे हलका व्यायाम आणि योग्य फॉर्मवर लक्ष देणं महत्त्वाचं असतं. बॉडीवेट एक्सरसाइज, स्ट्रेचिंग, लवचिकता वाढवणं, आणि हलक्या वजनाचं मार्गदर्शित प्रशिक्षण यावर भर दिल्यास उत्तम फाउंडेशन तयार होतं. या वयात लावलेली व्यायामाची सवय आयुष्यभर उपयोगी पडते.
या वयात हार्मोनल बदलांमुळे मसल ग्रोथ आणि ताकद वाढण्याची गती जास्त असते. व्यायामाचा परिणाम पटकन दिसतो. या काळात शरीर चांगल्या प्रकारे रिकव्हर होतं आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग, कार्डिओ, आणि अचूक डाएटच्या सहाय्याने फिटनेसचं पक्कं बेस तयार करता येतं.
या वयानंतर शरीराचा चयापचय थोडा मंदावतो, त्यामुळे आहार आणि विश्रांतीला महत्त्व द्यावं लागतं. ऑफिस बैठी जीवनशैली, तणाव, वजन वाढ, रक्तदाब यांसारख्या गोष्टींचा धोका वाढतो. त्यामुळे व्यायाम सुरू करून शरीराचं संतुलन राखणं आवश्यक होतं.
लहान वयात व्यायाम सुरू केल्यास शिस्त, वेळेचं भान, आणि आरोग्याच्या सवयी लवकर लागतात. यामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास वाढतो, एकाग्रता सुधारते आणि मानसिक तणाव कमी होतो. खेळांमध्ये कामगिरी सुधारते आणि दुखापती टाळता येतात. याशिवाय मेटॅबॉलिझम मजबूत होतं, जे भविष्यात लठ्ठपणा, डायबेटीस यांसारख्या आजारांपासून संरक्षण करतं.
जिम सुरू करताना शरीराची सध्याची स्थिती समजून घेण्यासाठी फिटनेस अस्सेसमेंट करून घ्या.
सुरुवातीला हलकी ट्रेनिंग घ्या, जड वजन लावण्याची घाई करू नका.
फॉर्म आणि टेक्निक यावर लक्ष द्या. व्यायामासोबत पुरेशी झोप, पाणी पिणं आणि पोषक आहार घ्या.
मुलं-मुली दोघंही जिम सुरू करू शकतात. यावेळी उद्दिष्टं वेगळी असू शकतात. मुलं मसल बिल्डिंगवर लक्ष केंद्रित करतात, तर मुली टोनिंग, स्टॅमिना किंवा कोअर स्ट्रेंथ वाढवण्यावर भर देतात.
जिम सुरू करण्यासाठी वयाचा मर्यादा नाही, फक्त मनाची तयारी आणि सातत्य असायला हवं. लहान वयात सुरुवात केली, तर फायदा नक्कीच होतो, पण उशीर झालेला असला तरी सुरुवात करायलाच पाहिजे. फॉर्म, आहार, झोप आणि मानसिक तयारी यांचं योग्य मिश्रण असेल, तर शरीर घडवणं सोपं होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.