
जसजसे आपण वय वाढते तसतसे आपल्या त्वचेतील कोलेजनचे उत्पादन कमी होणे, हार्मोन्समधील बदल असे अनेक बदल दिसून येतात. याशिवाय सूर्यप्रकाश आणि प्रदूषणामुळे त्वचा खराब होण्यास सुरुवात होते. यामुळे वातावरणाचा परिणाम त्वचेवर दिसून येतो. वयाच्या चाळीशी ओलांडल्यानंतरही तुम्ही तरुण राहावे असे तुम्हाला वाटत असेल, तर त्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. आज आम्ही तुमच्यासोबत एक खास स्किन केअर रूटीन शेअर करणार आहोत, ज्यामुळे वयाच्या ४० व्या वर्षीही तुमची त्वचा चमकदार आणि निरोगी राहील.
कोणत्याही स्किन केअर रूटीनची पहिली स्टेप म्हणजे त्वचा साफ करणे. तुमच्या त्वचेतील नैसर्गिक तेल टिकून राहील असा क्लिंजर निवडा. क्लीन्जर निवडताना, नेहमी लक्षात ठेवा की त्यात हायलुरोनिक ॲसिड आणि ग्लिसरीन आहे, जेणेकरून तुमची त्वचा मऊ आणि मॉइश्चराइज राहील.
वयाच्या 40 व्या वर्षी, बारीक रेषा, सुरकुत्या आणि वयाचे डाग टाळण्यासाठी तुमच्या त्वचेची काळजी घेण्याच्या रुटीनमध्ये अँटी एजिंग प्रोडक्टसचा समावेश करा. अँटी-एजिंग प्रोडक्टस निवडताना, त्यामध्ये रेटिनॉल, व्हिटॅमिन सी किंवा पेप्टाइड्ससारखे काही आवश्यक घटक असलेले प्रोडक्टस निवडा. या सर्व गोष्टी अँटी-एजिंग कमी करण्यास मदत करतात.यामुळे त्वचा वयाच्या चाळीशीनंतरही निरोगी राहील.
सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे रक्षण करण्यासाठी सनस्क्रीन लोशन वापरणे महत्वाचे आहे. जेणेकरून आपली त्वचा निरोगी आणि तरुण राहते. सनस्क्रीन SPF 50 असलेले असावे. घराबाहेर पडण्याआधी १५ मिनिटे अगोदर सनस्क्रीनचा लावा .पण तुम्ही घरी असाल तरीही तुम्ही सनस्क्रिन वापरु शकता. घरात असताना कमी एसपीएफ असलेले सनस्क्रीन वापरू शकता.
जसजसे तुमचे वय वाढत जाते तसतसे तुमची त्वचा पातळ होते आणि त्वचेत कोरडेपणा आणि काळपटपणा येऊ शकतो. त्यासाठी त्वचेला आतून आणि बाहेरून हायड्रेट करणे गरजेचे आहे. यासाठी दिवसभर भरपूर पाणी प्या. आणि हायड्रेटिंग स्किन केअर प्रोडक्टसचा रुटीनमध्ये समावेश करा. हायलूरोनिक ऍसिड, कोरफड किंवा ग्लिसरीन असलेले सीरम किंवा मॉइश्चरायझर्स वापरा.
डोळ्यांच्या आजूबाजूची त्वचा खूप नाजूक असते. त्यामुळे अँटी एजिंगची पहिले चिन्ह डोळ्यांभोवती दिसतात. डोळ्यांच्या आजबाजूला बारीक रेषा आणि सुरकुत्या दिसतात. अशा वेळी डोळ्यांखाली हायड्रेटिंग आय क्रीम किंवा सीरम लावू शकता.यामुळे डोळ्यांखालची स्कीन निरोगी राहील.
झोप पूर्ण न झाल्यास आरोग्यावर परिणाम होतोच पण त्याचा परिणाम आपल्या त्वचेवरही होतो. यामुळे त्वचेवर लवकर सुरकुत्या येण्यास सुरुवात होते. झोपेच्या कमतरतेमुळे तुम्हाला डार्क सर्कल आणि सूज येऊ शकते. यामुळे दररोज कमीत कमी ७ ते ८ तासांची झोप घ्या.
निरोगी, संतुलित आहार घेतल्याने तुमच्या त्वचेच्या आरोग्यावर परिणाम होतो. तुमच्या शरीराला आणि त्वचेला आवश्यक पोषक घटक पुरवण्यासाठी भरपूर फळे आणि भाज्या, संपूर्ण धान्य आणि प्रथिने खा. प्रक्रिया केलेले पदार्थ, साखरयुक्त पेय आणि जास्त मीठ किंवा अल्कोहोलचे सेवन टाळा. सतत बाहेरचे खाल्ल्याने शरीरासह त्वचेवरही परिणाम होतो.
Edited By: Priyanka Mundinkeri