
२०२४चे वर्ष संपायला काही दिवस राहिले असताना सगळेजण २०२५ ची वाट पाहत आहे. २०२५ च्या स्वागतासाठी अनेकांचे वेगवेगळी प्लानिंग सुरु झाली आहे. नव्या वर्षाच्या निमित्ताने अनेकांना सुट्टी असते. या सुट्ट्यांमध्ये ते बाहेर जायचा प्लान करतात. विशेषतः तरुण वर्ग आपल्या मित्रांसोबत नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी फिरायला जाण्यासाठी ट्रिप प्लान करतात पण काही वेळा ही ठिकाणं बजेट बाहेर असतात. परंतु आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा काही ठिकाणांबद्द्ल सांगणार आहोत. जेथे तुम्ही तुमच्या मित्रांसोबत बजेटमध्ये थर्टी फर्स्ट आणि न्यू इयर सेलिब्रेट करु शकता. येथे फिरण्यासाठी तुमचा कमीत कमी खर्च होईल आणि येथे पोहचणे देखील तेवढेच सोपे आहे. या ठिकाणांवर तुम्ही सुंदर आठवणी तयार करु शकता.
जर तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवायचा असेल, तर नवीन वर्ष साजरे करण्यासाठी मॅक्लोडगंज हे सर्वोत्तम ठिकाण आहे. हे हिल स्टेशन हिमाचल प्रदेश राज्यात आहे. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी तुम्ही येथील एका अप्रतिम कॅफेमध्ये जाऊन लाइव्ह म्युझिकचा आनंद घेऊ शकता. येथे रात्रीच्या वेळी चमकणारे ताऱ्यांना पाहण्याचा अनुभव तुम्ही घेऊ शकता. काहींच्या मते नवीन वर्षाचे सेलिब्रेशन म्हणजे केवळ पार्टी परंतु तसे नाही. प्रत्येक जण आपल्या आवडीप्रमाणे नवीन वर्षाच्या सेलिब्रेशन जर तुम्हाला नवीन वर्षाचे शांततेत स्वागत करायचे असेल, तर मॅक्लोडगंजमध्ये मोठ्या प्रमाणात बौद्ध मंदिरे आणि मठ आहेत. इथे गेल्याने तुमच्या मनाला खूप शांती मिळेल. नवीन वर्षाचा हा क्षण तुमच्यासाठी अविस्मरणीय ठरेल.
ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सुट्टीसाठी भारतातील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक म्हणजे मुंबई. जर तुम्हाला स्वप्नांचे शहर आणि मनोरंजन विश्वाची मायानगरी पाहायची असेल तर तुम्ही या काळात येथे येऊ शकता. या वेळी संपूर्ण शहर नववर्षाच्या उत्साहात असतो. थर्टी फर्स्ट, मोठे रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स सेलिब्रिटींना त्यांच्या चाहत्यासांठी लाइव्ह परफॉर्म करण्यासाठी आमंत्रित करतात. थर्टी फर्स्टच्या रात्री मुंबईतील मरीन ड्राईव्ह हे ठिकाण अनुभवण्यासारखे आहे. यासोबतच तुम्ही मुंबईत येत असाल तर वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मध्ये असलेल्या Jio World Plaza मॉलला भेट देऊ शकता. नववर्षानिमित्त येथे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. तसेच येथील सजावट तुम्हाला नक्की आवडेल.
भीमताल हे उत्तराखंडच्या नैनिताल जिल्ह्यातील एक छोटेसे शहर आहे. येथील सरोवराचे सुंदर दृश्य आणि किनाऱ्यावरील कॅन्डल लाइट डिनर यामुळे भीमतालची सहल नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी योग्य ठरते. जर तुम्हाला निसर्गावर प्रेम असेल तर तुम्ही इथे येऊ शकता. तुम्हाला येथे खाण्यासाठी आणि पिण्यासाठी अनेक चांगले कॅफे आणि रेस्टॉरंट्स देखील मिळतील. येथे तुम्हाला प्राचीन मंदिरे आणि प्रसिद्ध संग्रहालयही पाहता येतील. ज्या लोकांना पार्ट्या आवडत नाहीत ते येथे येऊन आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत नवीन वर्ष शांतपणे साजरे करू शकतात.
राजस्थानचे उदयपूर आपल्या सुंदर राजवाड्यांमुळे देशात आणि जगात प्रसिद्ध आहे. तसेच येथे अनेक रेस्टॉरंट्स आणि कॅफे आहेत, येथे तुम्हाला शाही पद्धतीने स्वादिष्ट पदार्थ दिले जातात. इतकेच नाही तर उदयपूरच्या सौंदर्यात भर घालणारे अनेक सुंदर सरोवरही तुम्हाला येथे पाहायला मिळतील. उदयपूरचे अनेक राजवाडे आलिशान हॉटेल्समध्ये बदलले आहेत, यापैकी कोणत्याही एका पॅलेसमध्ये तुम्ही नवीन वर्ष साजरे करू शकता. वाड्याच्या प्रत्येक खोलीचे भाडे वेगवेगळे आहे, त्यामुळे तुमच्या बजेटनुसार खोली निवडा. येथे तुम्ही राजशाही थाटचा आनंद घेऊ शकता.
नवीन वर्ष साजरे करण्यासाठी भारताची राजधानी दिल्लीत देखील तुम्ही येऊ शकता. जर तुम्हाला पार्टी करण्याची आवड असेल, तर दिल्ली तुम्हाला अजिबात निराश करणार नाही. नवी दिल्लीत, तुम्ही जेवणासाठी जुन्या दिल्लीला जाऊ शकता आणि दक्षिण दिल्लीच्या नाइटलाइफचा आनंद घेऊ शकता .दक्षिण दिल्लीत अनेक प्रसिद्ध क्लब आहेत, जिथे नवीन वर्ष मोठ्या उत्साहात साजरे केले जाते.
Edited By: Priyanka Mundinkeri