आता म्हातारपण येणार नाही? माणूस देणार मृत्यूला हुलकावणी?

Anti Aging Drug Human Clinical Trial ER 100: अमेरिकेतील एका नामांकित बायोटेक्नॉलॉजी कंपनीनं वैद्यकीय विश्वात खळबळ उडवून दिलीये. क्लिनिकल ट्रायल अंतर्गत एका रुग्णावर म्हातारपण येऊ नये यासाठी प्रयोग करण्यात आलाय. हा प्रयोग नेमका काय आहे? खरंच माणसाला अमरत्व मिळणं शक्य आहे का? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Experimental ER-100 gene therapy being tested to reverse aging cells and restore vision in patients.
Experimental ER-100 gene therapy being tested to reverse aging cells and restore vision in patients.saam tv
Published On

कल्पना करा, तुम्हाला म्हातारपण आलं नाही तर...? जे आजवर केवळ 'सायन्स फिक्शन' चित्रपटात पाहायला मिळायचं, ते आता प्रत्यक्षात घडण्याची शक्यता आहे. इतिहासात पहिल्यांदाच एका माणसाला असं औषध देण्यात आलंय, जे त्याचं म्हातारपण रोखू शकतं. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंत... अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी माणसाला 'अमरत्वाच्या' दिशेनं घेऊन जाण्यासाठी एक मोठं पाऊल टाकलंय.

अमेरिकेतील बोस्टनस्थित लाइफ बायोसायन्सेस या बायोटेक्नॉलॉजी कंपनीनं मोठं संशोधन केलंय. जगातील पहिल्या आंशिक सेल्युलर रिप्रोग्रामिंग क्लिनिकल ट्रायलमध्ये पहिल्या मानवी रुग्णाला औषधाचा डोस देण्यात आलाय. वैद्यकीय इतिहासातील हा ऐतिहासिक टप्पा ER-100 नावाच्या प्रायोगिक उपचाराद्वारे साधला जात आहे. ER-100 उपचारपद्धतीत, विशिष्ट सुधारित पुनर्रचना करणारे घटक डोळ्यांच्या पेशींमध्ये पोहोचवण्यासाठी जनुकीय उपचारांचा वापर केला जातो. याची चाचणी प्रामुख्याने काचबिंदू आणि वयाशी संबंधित इतर डोळ्यांच्या आजारांमुळे दृष्टी गमावत असलेल्या रुग्णांवर केली जातेय. ER-100 थेरपी वृद्ध पेशींना पुनरुज्जीवित करून रुग्णांची गेलेली दृष्टी परत मिळवून देईल, असं संशोधकांचं म्हणणं आहे.

या संकल्पनेला 2006 मध्ये जागतिक मान्यता मिळालीये. इतकंच नव्हे तर 2012 मध्ये विशिष्ट प्रथिनांच्या मिश्रणाचा वापर करून कोणत्याही प्रौढ पेशीला पुन्हा मूळ पेशीमध्ये रुपांतरित करणाऱ्या संशोधनासाठी वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. या संशोधनानंतर पुनरुत्पादक वैद्यकशास्त्राचं क्षेत्र कायमचं बदललंय. त्यामुळे पुढील काळात केवळ दृष्टीच नाही, तर माणसाला अमरत्व मिळणंही शक्य होणार का, याची उत्सुकता लागलीये...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com