Anjeer Soaked In Milk: दुधात भिजवलेले अंजीर खाण्याचे हे आहेत गुणकारी फायदे; जाणून घ्या...

benefits of anjeer: दुधात अंजीर भिजवून त्याचे रोज सेवन करणे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते.
Anjeer Soaked In Milk
benefits of anjeergoogle
Published On

दुधात अंजीर भिजवून पिणे हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते. त्यात दूध हे एक पौष्टिक पेय म्हणून लोकप्रिय होत आहे. दुधाचे सेवन केल्याने आरोग्याला आरोग्यदायी फायदे मिळतात. तुम्ही दररोज रात्री अंजीरचे दूध प्यायल्यास त्यात व्हिटॅमिन ए, सी, के, कॉपर, मॅग्नेशियम, पोटॅशियम, जस्त आणि लोह यांसारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो. त्याने तुम्ही हेल्दी जिवन जगू शकता. वाचा आणखी कोणकोणते फायदे होतात आणि कसे फायदे होतात?

चांगली झोप

झोपायच्या आधी अंजीर दुधाचे सेवन केल्याने ट्रिप्टोफॅन, सेरोटोनिनमध्ये रूपांतरित होणारे अमीनो आम्ल आणि झोपेचे हार्मोन्स मेलाटोनिन वाढल्यामुळे चांगली झोप येते. अंजीर आणि दुधाचे एकत्र सेवन केल्याने मोठ्या प्रमाणात पोषक तत्वे मिळतात. तसेच दुध हे पौष्टीक पेय मानले जाते. त्यामुळे आपल्याला शांत झोप लागण्यास मदत होते.

Anjeer Soaked In Milk
Winter Travel : थंडीची चाहूल अन् धुक्याची चादर, इगतपुरीचा अलौकिक नजारा पाहाच

रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अंजीर फायदेशीर

रोग प्रतिकारशक्ती वाढवणारे हे एक हेल्दी पेय आहे. रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, हाडे आणि दात मजबूत करण्यासाठी, मेंदूचे आरोग्य सुधारण्यासाठी, पोटातील जळजळ कमी करण्यासाठी आणि सांधे आणि स्नायू दुखणे कमी करण्यासाठी दुध आणि अंजीर खूप फायदेशीर ठरते. याव्यतिरिक्त, अंजीर आणि दुधाने जास्त काळ पोट भरून राहते. भूकेवर नियंत्रण ठेवण्यास हे पेय फायदेशीर आहे.

लो कॅलरीज

दुध आणि अंजीरचा गोडवा हा सगळ्यांच्या आवडीचा असतो. त्याने आपल्या शरीरात भरपूर प्रमाणात कॅलरीज मिळतात. कमी कॅलरी आणि उत्तम चव यामुळे, अंजीर हे संतुलित आहारात समाविष्ट केल्यावर वजन नियंत्रणात आणण्यास मदत करू शकते.

अंजीरचे सेवन केल्याने पचनसंस्था सुरळीत काम करते?

अंजीर आणि दुधात फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे, अंजीर पचनास मदत करते असे मानले जाते. अंजीराचे वारंवार सेवन केल्याने आतड्याची हालचाल सुधारण्यास, तसेच त्यांवर होणारे गंभीर परिणाम दूर होतात. अंजीराने आपली पचनसंस्था मोठ्या प्रमाणात सुधारते. अंजीर पाचन समस्यांवर नैसर्गिक उपाय देतात जे सिंथेटिक सप्लिमेंट्सची गरज न ठेवता आतड्याचे आरोग्य वाढवते.

दुधात भिजवलेले अंजीर कसे तयार करावे

अंजीरचे दूध तयार करण्यासाठी अंजीरचे काही तुकडे दुधात ४-५ तास भिजत ठेवा, बारीक करून पेस्ट बनवा, नंतर एक ग्लास दुधात मिसळा आणि उकळा. केशरचा समावेश तुम्ही करु शकता. अंजीरमुळे दुधाला नैसर्गिकरित्या गोड चव येते. तुम्ही कमकुवत लोकांना अंजीर पाण्यात भिजवून झोपेच्या आधी स्नॅक म्हणून देवू शकता.

Written By: Sakshi Jadhav

Anjeer Soaked In Milk
Nachos Chaat At Home Recipe: घरच्याघरी बनवा हेल्दी नाचोस चाट; नोट करा सिंपल रेसिपी

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com