.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
सध्या ऑनलाइन शॉपिंगच वेड सगळ्याच लोकांना आहे. सद्याच्या धावपळीच्या युगात कित्येकांना आपल्या कामापासुन फारसा वेळ मिळत नाही म्हणून कित्येक जण शॉपिंगसाठी ऑनलाईनचा पर्याय निवडतात, असं असलं तरी कित्येकांना आपले Ethnic suit टेलरकडून शिवून घ्यायला आवडतात. रेडिमेट कपड्याची फिटिंग ही कधी कधी कमी जास्त होत असते पण परफेक्ट लुक आणि परफेक्ट फिटिंग ही तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्हीं काही छोट्या छोट्या महत्वाच्या गोष्टींची काळजी घेता.
तुम्हाला माहितेय का टेलर कडून कपडे शिवून घेताना काय काळजी घ्यायला हवी ? किंवा कपडे शिवण्याआधी कोणत्या गोष्टी विचारात घ्यायला हव्यात? या सगळ्यांची माहिती मी तुम्हांला या लेख द्वारे देणार आहे,
आशा 5 महत्वाच्या टिप्स तुम्हांला सांगणार आहे, ज्यामुळे टेलरकडे गेल्यावर तुमचा गोंधळ होणार नाही.
1 . टेलरशी आधीच बोलून घ्या
जर तुमच्या डोक्यात काही डिजाईन फिक्स असेल तर त्यासाठी लागणारा फॅब्रिक कोणता असावा आणि तो किती मीटर घ्यावा लागेल याबद्दल आपल्या टेलरशी बोलून घ्या. त्यासाठी तुमच्या टेलरचा नंबर हा तुमच्याकडे असायलाच हवा.
2 . कॉटनचे फॅब्रिक नेहमी धुवून घ्यावे.
जर तुम्हीं ड्रेस शिवायला कॉटन कापड चा वापर करत असाल तर नेहमी कॉटनचे फॅब्रिक धुवूनच घेऊन जावे, कारण ड्रेस शिवल्यानंतर कापड आकसण्याची शक्यता जास्त असते म्हणून कॉटनचे कपडे धुवून घेऊन जावे, जर रंग जाण्याची भीती असेल तर मिठाच्या पाण्यात कॉटनचे कपडे धुवावे.
3. डिजाईनबद्दल आधीच विचार करा.
टेलरकडे जाण्याआधीच आपल्याला कोणत्या डिजाईनचा ड्रेस शिवायचा आहे त्या बद्दल आधीच विचार करायला हवा, म्हणजे नेकलाईन कशी असावी? बॉटम कशा पद्धतीने हवीय ? लेस कोणत्या डिझाईनची लावायची याबद्दल लागणारं साहित्य ही सोबत घेवून जावे जेणेकरून टेलर कडे गेल्यावर तुमचा गोंधळ होणार नाही. सद्या pintrest वर आपल्याला वेगवेगळ्या डिजाईनचे ड्रेस pattern सरास पाहायला मिळतात. त्यावरूनही आपण आयडिया घेऊ शकतो.
4. कोणत्या प्रकारचं फॅब्रिक खरेदी करावं.
मखमली फॅब्रिक जाड आणि मऊ असतं त्यामुळे शक्यतो हिवाळ्यात ह्या फॅब्रिकचे कपडे घातले जातात. परंतु तुम्हांला कोणत्या कार्यक्रमासाठी किंवा कोणत्या प्रसंगी ड्रेस शिवायचा आहे हे लक्षात घेऊनच फॅब्रिकची निवड करावी.
5 . फ्रेश माप देने.
कित्येक वेळा तुमचे टेलर तुम्हांला जुना ड्रेस घेवून यायला सांगतात त्याच्या साईज ने ड्रेस शिवतो असं म्हणतात, पण ड्रेस शिवायला देतांना नेहमी टेलरला नवीन माप घ्यायला सांगा जेणेकरून आपल्याला नेहमी comfortable आणि परफेक्ट फिटिंग मिळेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.