Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेनिमित्त घरी सुख-समृद्धी येणार; मनोभावे करा मिठाची पुजा

Akshaya Tritiya Salt Puja : मिठाची पुजा केल्याने घरातील ताण, भीती आणि नैराश्य कायमचं दूर होतं. तसेच घरात समृद्धी नांदते. मात्र अनेक व्यक्तींना याबाबत माहिती नाही.
Akshaya Tritiya Salt Puja
Akshaya Tritiya 2024Saam TV
Published On

अक्षय्य तृतीयेनिमित्त हिंदू धर्मातील प्रत्येकाच्या घरी पुजा केली जाते. अक्षय्य तृतीया हा सर्वात महत्वाचा दिवस आहे. या दिवशी आपल्या घरी सुख, शांती, समृद्धी येण्यासाठी प्रत्येक व्यक्ती देवाची आराधना करतो. यासह काही व्यक्ती नवी मालमत्ता, सोनं, चांदी आणि सुंदर वस्तू देखील खरेदी करतात.

Akshaya Tritiya Salt Puja
Akshaya Tritiya Gold Rate : अक्षय्य तृतीयेनिमित्त सोनं खरेदी करताय? वाचा तुमच्या शहरातील नवे दर

तुम्ही देखील तुमच्या घरी विविध फळांसह खाण्यापिण्याच्या काही गोष्टींची पुजा करत असाल. पण तुम्हाला माहिती आहे का? या सर्वांमध्ये मिठाची देखील पुजा केली जाते. मिठाची पुजा केल्याने घरातील ताण, भीती आणि नैराश्य कायमचं दूर होतं. तसेच घरात समृद्धी नांदते. मात्र अनेक व्यक्तींना याबाबत माहिती नाही.

मिठाच्या पुजेचं महत्व

तुमच्या घरी देखील भरभराट यावी असं वाटत असेल तर अक्षय्य तृतीयेच्या दिवशी मिठाची पुजा नक्की करा. मीठ आहारशास्त्रासह वास्तुशास्त्रासही अत्यंत महत्वाचं आहे. ज्योतिषशास्त्र आणि आर्युवेदातही मिठाला फार महत्व आहे.

धनसंपत्तीसाठी करतात पुजा

जेवणात मीठ नसेल तर पदार्थ आळणी लागतात. त्यामुळेच पदार्थांची चव वाढवण्यासाठी आणि धनसंपत्तीची भरभराट व्हावी यासाठी मिठाची पुजा करतात.

अशी करा पुजा

अक्षय्य तृतीयेनिमित्त सकाळी उठव्यावर पवित्र स्नान घ्या. त्यानंतर देव्हाऱ्याची सफाई करा.

वेदीवर आधी लाल किंवा पिवळे कापड ठेवून घ्या.

त्यावर लक्ष्मी, भगवान विष्णू, गणेश आणि कुबेर देव यांच्या मुर्ती ठेवा.

गंगाजल, कुंकू आणि फळे त्यासह सर्वात महत्वाचे मीठ यावर ठेवा.

पुढे कनकधारा स्तोत्र, विष्णु नामावली, कुबेर चालीसा, गणेश चालीसा यांचे पठण करत पुजा करा.

माता लक्ष्मी ही सागर कन्या आहे आणि मीठ देखील सागरातून येते. त्यामुळे देवीची पुजा करताना मिठाची पुजा करणे देखील महत्वाचे मानले जाते.

Akshaya Tritiya Salt Puja
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेनिमित्त कन्यारत्न प्राप्त झालंय; मग माता लक्ष्मीची 'ही' नावं चिमुकलीचं भाग्य उजळवतील

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com