Ajwain Benefits : ओव्यासह 'हे' पदार्थ दररोज खा! आरोग्यास मिळणारे फायदे वाचून चकित व्हाल

Ajwain Benefits For Health : ओव्यासह आहारात कोणता पदार्थ खाल्ला पाहिजे? याची माहिती आज जाणून घेणार आहोत. याचे आरोग्यास देखील अनेक फायदे होतात.
Ajwain Benefits For Health
Ajwain BenefitsSaam TV
Published On

भारतीय मसाल्यांमध्ये ओवा आयुर्वेदिक आणि गुणकारी आहे. ओवा खाल्ल्याने आपल्या आरोग्याला अनेक फायदे मिळतात. भारतात विविध पदार्थ बनवताना चव वाढण्यासाठी त्यात ओवा टाकला जातो. ओवा खाल्ल्याने तुम्हाला आपल्या आरोग्याला अनेक गुणकारी फायदे मिळतात.

Ajwain Benefits For Health
Chapati Benefits: दररोज एक चपाती खा आणि बारीक व्हा; वाचा या मागचं लॉजीक

पोट दुखी, वजन कमी करणे यासह विविध गोष्टींसाठी ओवा फार उपयुक्त आहे. ज्या व्यक्तींना पोटाच्या विविध समस्या आहेत त्यांनी ओवा खाल्ला पाहिजे. याने अपचन होत असल्यास लगेचच पोट रिकामं होतं. ओव्याची चव थोडी तिखट असते. त्यामुळे फक्त ओवा खाता येत नाही. त्यामुळे ओव्याबरोबर कोणते पदार्थ खाल्ले पाहिजेत याची माहिती आज जाणून घेणार आहोत.

बडिशेप आणि ओवा

ओवा आणि बडिशेप यांचे मिश्रण एकत्र असल्यास त्याची चव आणि स्वाद उत्तम लागते. त्यासह यासा मस्त सुवास येतो. तुम्ही माऊथ फ्रेशनर म्हणून सुद्धा ओवा आणि बडिशेप खाऊ शकता. ओवा आणि बडिशेप एकत्र करून तुम्ही याची पावडर सुद्धा बनवू शकता. जेव्हा तुम्ही ऑइली किंवा हेवी फूडचे सेवन करता तेव्हा ओवा आणि बडिशेपची पावडर पाण्यात मिक्स करून प्यायले पाहीजे.

ओवा आणि अद्रक

ओला आणि अद्रक यांची एकत्र पेस्ट तुम्ही जेवणात मिक्स केल्यास त्याने निरोगी आरोग्य राहते. तसेच तुमची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते. हिवाळ्यात अनेक व्यक्तींना सर्दी, खोकला, ताप अशा विविध समस्या उद्भवतात. त्यावेळी तुम्ही जेवणात याचा उपयोग करू शकता. ओवा आणि अद्रक दोन्ही देखील सर्दी, खोकल्यासाठी उपयुक्त आहेत. तुम्ही अद्रकची चहा बनवताना त्यात ओवा सुद्धा टाकू शकता. याने घसा खराब झाला असल्यास लगेचच बरा होतो.

ओवा आणि हिंग

पचन, सर्दी खोकला अशा विविध समस्यांवर ओवा आणि हिंग याचं मिश्रण मात करतं. तुम्ही भाजी बनवताना त्यात फोडणी टाकताना हिंग आणि ओवा टाकू शकता. या फोडनीपासून बनवलेलं जेवण अधिक रुचकर लागतं. घरात लहान मुलं जेवणासाठी नेहमी नाटकं करतात. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने जेवण बनवाल तर लहान मुलं संपूर्ण ताट रिकामं करतील.

Ajwain Benefits For Health
Ajwain Leaves Benefits : हिवाळ्यातील अनेक आजारांवर बहुगुणी ठरतील ओव्याची पाने!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com