Mouth Freshener Video : अरे बापरे! 'माउथ फ्रेशनर' खाताच ग्राहकांना रक्ताची उलटी; प्रसिद्ध हॉटेलमधील धक्कादायक घटना

Viral Video : माउथ फ्रेशनर खाल्ल्याने पुढे आपल्याला रुग्णालयात जावं लागेल असा विचारही त्यांच्या मनात आला नसावा. माउथ फ्रेशनर खाताच महिलेच्या आणि अन्य व्यक्तीच्या तोंडात जळजळ होऊ लागली.
Mouth Freshener Video
Mouth Freshener VideoSaam TV
Published On

Haryana News :

हरियाणाच्या गुरुग्रामधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. जेवणानंतर हॉटेलमध्ये माउथ फ्रेशनर खाल्ल्याने येथील एका महिलेच्या तोंडातून रक्त येऊ लागले. महिलेसह अन्य काही मित्रही हॉटेलमध्ये आले होते, त्यांना देखील असा त्रास जाणवू लागला. त्यामळे या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Mouth Freshener Video
तिन्ही खानांना साइन करण्यासाठी चड्डी-बनियान विकावी लागेल, Anant Ambani च्या प्री-वेडिंगनंतर Shah Rukh Khan चा जुना VIDEO व्हायरल

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अंकित कुमार आपल्या मित्रांसह एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. जेवण केल्यावर या सर्वांनी माउथ फ्रेशनर खाल्लं. माउथ फ्रेशनर खाल्ल्याने पुढे आपल्याला रुग्णालयात जावं लागेल असा विचारही त्यांच्या मनात आला नसावा. माउथ फ्रेशनर खाताच अंकित कुमार यांच्या पत्नी आणि अन्य मित्रांच्या तोंडात जळजळ होऊ लागली. अचानक तोंडातून रक्त येऊ लागलं.

यातील २ जणांना रक्ताच्या उलट्या देखील झाल्या. अंकित यांच्याकडे त्यांची लहान मुलगी असल्याने त्यांनी हे खाल्लं नव्हतं. त्यामुळे त्यांना काहीही झालं नाही. प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांनी पत्नी आणि मित्रांना रुग्णालयात दाखल केले. सध्या यातील दोघांची प्रकृती जास्त गंभीर असल्याचं समजलं आहे. डॉक्टरांकडून त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्यात येत आहेत.

सदर घटनेचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. डॉक्टरांनी रुग्णांना तपासल्यावर सांगितले की, त्यांनी माउथ फ्रेशनर समजून ड्राय आईस खाल्ला आहे. ड्राय आईस माणवी शरीरासाठी घातक आहे. फक्त कुलींगसाठी याचा वापर केला जातो. काब्रनडायऑक्साइडचे घनरुप म्हणजे हा ड्राय बर्फ होय.

ड्राय बर्फ खाल्ल्याने त्यांच्या पोटात आणि तोंडात इजा झाली. स्कीन जळू लागली आणि रक्तस्त्राव होऊ लागला. त्यामुळे यातील काही जणांना रक्ताच्या उलट्या देखील झाल्या. ही चूक हॉटेलमधील व्यक्तींच्या निष्काळजीपणामुळे झाली असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे अंकित यांनी सदर घटनेची पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी हॉटेल मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Mouth Freshener Video
Mira Bhayandar Crime: मिरा भाईंदर पोलिसांची मोठी कारवाई! ट्रक चोरी करणाऱ्या टोळीला अटक; तब्बल ७ कोटी ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com