Ajwain Leaves Benefits : हिवाळ्यातील अनेक आजारांवर बहुगुणी ठरतील ओव्याची पाने!

ओव्याचा उपयोग आपण वेगवेळ्या पदार्थत टाकण्यासाठी करतो त्यामुळे जेवणाला एक वेगळी चव येते.
Ajwain Leaves Benefit
Ajwain Leaves BenefitSaam Tv

Ajwain Leaves Benefits : ओव्याचा उपयोग भारताच्या प्रत्यक घरात केला जातो पण बऱ्याच लोकांना माहिती नसेल की ओव्याच्या पानचा सुद्धा वापर केला जातो. ओव्याचा उपयोग आपण वेगवेळ्या पदार्थत टाकण्यासाठी करतो त्यामुळे जेवणाला एक वेगळी चव येते किंवा जेवणानंतर बडीशोपसोबत ओवा खायला देतात.

त्याच ओव्याच्या पानात औषधी गुण आहेत आयुर्वेदात याला महत्वाचे स्थान देण्यात आले आहेत.चला तर जाणून घेऊ या पानांचा नक्की वापर कसा केला पाहिजे हे जाणून घेऊया

Ajwain Leaves Benefit
Health Tip : जीभेचा रंग वारंवार का बदलतो ? नेमके कारण काय ? 'हा' आजार की, समस्या

1. फ्रेश ग्रीन ज्यूस

या ओव्याच्या पानाचा उपयोग तुम्ही तुमच्या आवडीच्या ज्यूस सोबत करू शकता.तुमच्या आवडीचा कोणताही ज्यूस घ्या त्यात या २/३ओव्याची पाने टाकून तुम्ही ती ड्रिंक घेऊ शकता त्यामुळे तुमच्या पचनाच्या समस्या सुटण्यास मदत होईल.कारल्याचा रस,पालकचा रस, गाजरचा ज्यूस किंवा मोसंबी ज्यूस यामध्ये ओव्याची ४/५ पाने बारीक करून टाकू शकता.तुमच्या आरोग्य (Health) नेहमी निरोगी राहील.

2. भजी बनवण्यासाठी वापर

आळूच्या पानाची जशी भजी बनवली जातात तशीच भजी आपण या ओव्याच्या पानापासून बनवू शकतो किंवा मसालेदार (Spices) बेसन मध्ये ओव्याच्या पाने टाकून त्यांना तेलात डीप फ्राय करून गरमा गरम खाऊ शकता.

Ajwain Leaves Benefits
Ajwain Leaves BenefitsCanva

3. चटणी बनवण्यासाठी वापर

लसूण,हिरवी मिरची,अदरक आणि मीठ टाकून सोबत ओव्याच्या पानाची पेस्ट करून घ्या आणि दोन्ही एकत्र मिक्स करून त्याची चटणी करा.ही चटणी तुम्ही समोसा, कचोरी,भजी कशासोबतही सहज खाता येते. याना दही सोबत सुद्धा खाऊ शकतो.

4. सर्दी,खोकलासाठी उपयुक्त

सर्दी (Cold) खोकला होत असले तर ओव्याचा पानाचा काढा दिवसातून २ वेळा पिला पाहिजे.ओव्याचा १५/३० पान स्वच्छ पाण्याने (Water) साफ करून त्याला गरम पाण्यात उळवून घ्या.कमी आचेवर टाकलेल्या पाण्याचे ३%पाणी शिल्लक राहील तोपर्यंत उकळून घ्या. हा काढा २/३ दिवस घेतल्यावर तुमची सर्दी आणि खोकला हळुहळू कमी होईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com