Health Tip : आरोग्याच्या बाबतील आपण सगळेच दुर्लक्ष करतो. आपल्या आरोग्यामध्ये वारंवार बदल होत असतात ज्यांची आपल्याला तीळमात्र कल्पना नसते. त्यातील एक समस्या आपल्या तोंडाचे आरोग्य. आपल्या जीभेचा रंग बदलतो का ? याचे आपल्या कुणालाच कारण माहित नाही किंवा सहसा आपण त्याचा विचारही करत नाही. पण तुमच्या जीभेचा रंग बदलला तर तुमच्या आरोग्यावर त्याचा सहज परिणाम होऊ शकतो.
आयनच्या कमतरतेमुळे जीभेचा रंग बदलतो असे डॉक्टरांचे मत आहे जाणून घेऊया त्याबद्दल. शरीरातील आयरन कमी झाल्यामुळे अशक्तपणा येऊ शकतो. आयन लाला रक्तपेशी निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे असते.
ते पूर्ण शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्यायचे काम करत असते.आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी फायबर, व्हिटॅमिन, मिनिरलस, आयन, आपल्या आहारातून मिळाले पाहिजे. शरीरातील आयन कमी झाल्यामुळे ऑनिमिया सारखे आजार उद्भवू शकतात. थकवा येणे, अशक्तपणा जाणवणे, चेहऱ्यावर पिंपल्स (Pimples) येणे,चक्कर येणे या समस्या आयनच्या कमतरतेमुळे होतात.
1. आयन कमी होण्याचे लक्षणे
कमजोरी येणे, हृदयाची ठोके अनियमित,चक्कर येणे ,थोडेसे चालले तरी लगेच थकवा येणे, चेहऱ्यावर पिंपल्स येणे, त्वचा पिवळी पडणे हे आयन कमी होण्याचे काही लक्षणे आहेत. तसेच अनिमिया होण्याची शक्यता असते या आजारांकडे (disease) गंभीरपणे लक्ष देणे गरजेचे आहे. त्याचे कारण आयनची कमी असते. त्वचेच्या (skin) संबधित रोगाचे कारण सुद्धा आयनची कमतरता असू शकते.
2. तोंड येणे
आयन कमी झाल्यावर सारखं सारखं तोंड येत असते त्याचा खूप त्रास होतो.त्यासाठी लोक वेगवेगळे जेल लावतात पण ते तेवढ्यापूर्तच आराम मिळते.पण त्याचे मूळ कारण आयन आहे. तुमच्या शरीरात आयन प्रमाणात आल्यावर तुम्हाला अशा समस्या कधी येणार नाही आयन प्रमाणात येण्यासाठी तुम्हाला पौष्टिक आहार घेणे गरजेचे आहे
3. जीभेचा रंग बदलणे
जीभेचा रंग पांढरा होणे याकडे दुर्लक्ष करू नका. त्याचे कारण आयनची कमतरता असू शकते त्यामुळे जर तुम्हाला इतर त्रास सुध्दा होत असेल.जीभ वर सूज येणे, दुःखणे आणि चमकणे, जिभेचा रंग हलका गुलाबी बदलून पांढरा होणे म्हणजेच आयन कमी होणे.
4. आयनची कमी पूर्ण कशी करावी
तुमच्या आहारात काही गोष्टीचा समावेश करून तुम्ही आयन लेवल बरोबर करू शकता.तुमच्या आहारात हिरव्या भाज्या,मांस,ड्राय फ्रूटस,डेअरी उत्पादन यांचा समावेश करून आयन प्रमाणात आणू शकता. पौष्टिक आहार (food) व शरीरात ऑक्सिजन संतुलित ठेवण्यासाठी मदत होते.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.