Saam Tv
तुम्हाला रोज चपाती खायची सवय असेल. मात्र वाढत्या वजनाची समस्या तुम्हाला उद्भभवत असतील तर आता काळजी करु नका.
वजन कमी करण्यासाठी चपाती सोडण्याची काहीच गरज नाही आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त योग्य गहू निवडणे गरजेचे आहे.
तुम्ही तयार पिठ बाजारातून विकत आणत असाल तर ते ही योग्य आणि तारिख पारखुनचं घ्यावे. त्यामुळे शरीराला जास्त प्रमाणात फायबर मिळू शकतात.
तुम्ही रोज आहारात चपाती खात असाल तर तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहते. त्यामुळे डायेटसाठी चपातीचा वापर करु शकता.
डायेटमध्ये शक्यतो दिवसभरात दोन चपात्यांचाच समावेश करावा. चपातीमुळे शरीराला कॅलेरीज मिळतात.
तुम्ही चपाती डाळ, पनीर, मांस, हिरव्या पालेभाज्यांसह खावू शकता. त्यामुळे तुमच्या शरीरातील साखरेचे प्रमाण कमी होते.
चपातीला तुम्ही भरपूर तेल किंवा तूप वापरु नका. त्याने तुमच्या कॅलेरीत वाढ होईल आणि तुम्ही लठ्ठ व्हाल. त्यामुळे खुप कमी प्रमाणात तेलाचा वापर करा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.