Work from home back pain: दिवसभर घरातून काम करणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा; चुकीच्या पद्धतीने बसल्याने वाढतोय पाठदुखीचा त्रास

work from home health problems: वर्क फ्रॉम होममध्ये तासन्तास चुकीच्या पद्धतीने बसणे, लॅपटॉपकडे सतत खाली पाहणे आणि हालचाल न करणे यामुळे पाठ, मान आणि खांदेदुखीचा त्रास होऊ शकतो. योग्य पोस्चर, नियमित हालचाल आणि व्यायामाने हे त्रास कमी करण्यास मदत होऊ शकते.
Work from home back pain: दिवसभर घरातून काम करणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा; चुकीच्या पद्धतीने बसल्याने वाढतोय पाठदुखीचा त्रास
Published On

घरातून काम करण्याची सवय अनेकांच्या आयुष्याचा भाग आहे. मात्र कामासाठी तासन्तास एकाच जागी बसून राहणं आता आरोग्यासाठी त्रासदायक ठरतंय. चुकीच्या पद्धतीने बसणं, लॅपटॉपकडे सतत खाली पाहणं आणि कामाच्या मध्ये शरीराची हालचाल न करणं यामुळे ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या अनेकांना पाठ, मान आणि खांदेदुखीचा त्रास होतोय.

पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा रुग्णालयातील फिजिओथेरपिस्ट डॉ. अर्जुन म्हाडगुत यांच्या मते, पूर्वीच्या कामाच्या पद्धतीत लोकांची हालचाल तुलनेने जास्त होती. मीटिंगसाठी दुसऱ्या ठिकाणी जाणं, कामाची जागा बदलणं किंवा ऑफिसला जाण्या-येण्यासाठी प्रवास करणं यामुळे शरीर एक्टिव्ह राहत असे. आता मात्र अनेक दिवसातील बराच वेळ लॅपटॉपसमोर बसून घालवतात.

Work from home back pain: दिवसभर घरातून काम करणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा; चुकीच्या पद्धतीने बसल्याने वाढतोय पाठदुखीचा त्रास
High blood pressure: मधुमेह आणि हायपरटेन्शन बनतंय साइलेंट किलर, या ५ लक्षणांकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात

लॅपटॉपवर काम करताना सतत खाली पाहिल्याने मानेवर ताण येतो. तसंच पुढे वाकून बराच वेळ बसल्याने पाठीवरही दबाव वाढतो. सोफा किंवा बेडवर बसून काम केल्यास पाठीला पुरेसा आधार मिळत नसल्याने समस्या अधिक वाढू शकते. दीर्घकाळ अशीच स्थिती राहिल्यास स्नायूंमध्ये कडकपणा येतो आणि पोट, कंबर व पाठीच्या स्नायूंची ताकद कमी होऊ शकते. त्यामुळे वारंवार पाठदुखी किंवा मानदुखीचा त्रास होण्याची शक्यता वाढते.

डॉ. म्हाडगुत यांनी सांगितले की, ‘वर्क फ्रॉम होम’मुळे पाठदुखीच्या तक्रारींमध्ये ७० टक्क्यांनी वाढ झाली आहे. दर महिन्याला ३५ ते ५५ वर्षे वयोगटातील १० पैकी ७ काम करणारे लोक तीव्र पाठदुखीच्या तक्रारी घेऊन येतात. या वेदनांचा त्यांच्या रोजच्या कामावर आणि जीवनावर परिणाम होतो. अशा रुग्णांना फिजिओथेरपीचा सल्ला दिला जातो.

Work from home back pain: दिवसभर घरातून काम करणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा; चुकीच्या पद्धतीने बसल्याने वाढतोय पाठदुखीचा त्रास
Home Accident: शेल्फ फुटला अन् काचेचा तुकडा पायात घुसला, चालण्याची शक्यताच संपली होती, पण...! डॉक्टरांनी वाचवला तरूणाचा पाय

पाठदुखीकडे वेळीच लक्ष न दिल्यास समस्या पुढे वाढू शकते. काही रुग्णांमध्ये वेदना पायांपर्यंत जाऊ शकतात. पाय किंवा शरीराचा एखादा भाग सुन्न होणं, अशक्तपणा जाणवणं तसंच चालताना किंवा इतर हालचाली करताना अडचण येऊ शकते.

मणका निरोगी ठेवण्यासाठी नियमित हालचाल आवश्यक आहे. आठ ते दहा तास योग्य पद्धतीने बसून काम केलं तरी त्या काळात अजिबात न उठणं योग्य नाही. कामाच्या मध्ये थोडा वेळ उठणं, चालणं आणि नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे.

फिजिओथेरपीमुळे अशा अनेक प्रकारच्या पाठ आणि मानदुखीमध्ये फायदा होऊ शकतो. यामध्ये शरीराची हालचाल सुधारण्यासाठी व्यायाम, पोट-कंबर-पाठीचे स्नायू मजबूत करण्याचे व्यायाम आणि चुकीच्या हालचाली सुधारण्याचे प्रशिक्षण दिले जाते. दैनंदिन काम करताना कोणती काळजी घ्यावी आणि कोणत्या सवयी बदलणं गरजेचं आहे.

Work from home back pain: दिवसभर घरातून काम करणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा; चुकीच्या पद्धतीने बसल्याने वाढतोय पाठदुखीचा त्रास
Heart stent blockage: रक्तवाहिन्यांमध्ये स्टेंट टाकल्यानंतरही पुन्हा ब्लॉकेजचा धोका; डॉक्टरांनी सांगितलेली कारणं ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com