जगभरात अशी अनेक रहस्य आहे, ज्यांचा अजून उलगडा झालेला नाही. तर काही अशा जागाही आहेत, जिथे भयानक घटना घडतात, मात्र त्यामागील कारणं अजून समोर आलेली नाहीत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका जागेबद्दल सांगणार आहोत, ज्या ठिकाणी पक्षी आत्महत्या करतात.
आतापर्यंत तुम्ही माणसांना आत्महत्या करताना ऐकलं असेल. पण जगात एक अशी रहस्यमयी जागा आहे, ज्या ठिकाणी पक्षी आत्महत्या करतात, असा दावा केला जातो. हे रहस्यमय ठिकाण आसामच्या बोरेल असून डोंगरांच्या मधोमध हे गाव आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, या गावाला 'सुसाईड पॉइंट ऑफ बर्ड्स' असंही म्हटलं जातं.
कदाचित तुम्हाला हे ऐकून मोठा धक्का बसेल पण केवळ एक किंवा २ नाही तर आतापर्यंत अनेक पक्षांचा या ठिकाणी मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. केवळ या गावातीलच नाही तर बाहेरून या ठिकाणी आलेल्या पक्षांनी देखील आत्महत्या केल्याचा दावा केला जातो.
सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यात या आत्महत्येच्या घटना अधिक घडत असल्याचं म्हटलं जातं. अहवालानुसार, असं समोर आलं आहे की, या भागामध्ये पक्षी फार वेगाने उडतात. त्यांचा वेग इतका जास्त असतो की, ते इमारती किंवा झाडांवर जाऊन आपटतात. या पक्ष्यांना बसलेली धडक इतकी जोरात असते की ते यामध्ये गंभीर जखमी होतात आणि त्यांचा मृत्यू होतो. सांगण्यात येते.
पक्षीतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी जास्त मॅग्नेटिक पॉवर असल्याने इमरातींना पक्षी आदळतात. शिवाय या ठिकाणी वारे वेगाने वाहतात. यामुळे, पक्षी प्रकाशाच्या स्त्रोताजवळ उडतात. प्रकाशाच्या कमतरतेमुळे ते स्पष्टपणे पाहू शकत नाहीत. यामुळे घर किंवा झाडांवर आदळतात आणि त्यांचा मृत्यू होतो.
डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.