Archaeological discovery: इतिहासातलं मोठं रहस्य उघड; पुरातत्त्व विभागाला सापडली बायबलमध्ये नमूद केलेली ३,००० वर्षे जुनी वास्तू

3000 year old structure in Bible: इतिहास आणि धर्म यांच्यातील नात्यावर नेहमीच वादविवाद होत असतो. मात्र, अलीकडेच इस्रायलमधील पुरातत्व विभागाने (Archaeological Department) केलेल्या एका शोधाने बायबलमध्ये उल्लेखलेल्या अनेक कथांना ऐतिहासिक पुष्टी दिली आहे.
Archaeological discovery
Archaeological discoverysaam tv
Published On

प्राचीन जेरुसलेमच्या उत्खननात पुरातत्त्वज्ञांनी एक महत्त्वाचा शोध लावला आहे. ‘सिटी ऑफ डेव्हिड’ या ठिकणी जेरुसलेम वॉल्स नॅशनल पार्कमध्ये त्यांना एक विशाल खंदक आढळला आहे. बायबलमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे, या शोधामुळे जेरुसलेम दोन विभागांत विभागलेलं होतं, हे आता स्पष्ट झालं आहे.

हा खंदक सुमारे नऊ मीटर खोल आणि तीस मीटर रुंद आहे. संशोधकांच्या मते, यामुळे वरचा शहरभाग जिथे मंदिर आणि राजवाडा होता आणि खालचा शहरभाग यांच्यात भौगोलिक विभागणी झाली होती. उंच दगडी तटबंदीमुळे हा भाग ओलांडणं अशक्य होतं. त्यामुळे ‘सिटी ऑफ डेव्हिड’ आणि मंदिर पर्वत तसंच ओफेल प्रदेश यांच्यात हा खंदक नैसर्गिक अडसर ठरला होता.

Archaeological discovery
Alien: नासाच्या सिक्रेट लॅबमध्ये ठेवलाय एलियन्सचा मृतदेह; प्रसिद्ध जादूगाराचा दावा, पाहा काय केला खुलासा

पुरातत्त्वज्ञांना या खंदकाचा उद्देश नीट समजला नव्हता. मात्र पुढील संशोधनानंतर स्पष्ट झालं की, तो खालच्या शहराच्या उत्तरेकडील तटबंदीचा भाग होता. यामुळे दक्षिणेकडील निवासी वस्ती आणि उत्तरेकडील दुर्ग (अक्रोपोलिस) यांची सीमा ठरली होती. हा खंदक सुमारे तीन हजार वर्षांपूर्वीचा असून तो राजा योशियाच्या काळातील म्हणजेच यहूदाच्या राज्याची राजधानी असलेल्या जेरुसलेममधील आहे.

Archaeological discovery
What do you know about Mumbai? : शहर एक नावं अनेक! नवी मुंबई ते ग्रेटर मुंबई आणि सब अर्बन मुंबई यांमध्ये फरक काय?

गेल्या १५० वर्षांच्या संशोधनानंतर, अखेर या तटबंदीचं संपूर्ण रूप समोर आलं आहे. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, या खंदकामुळे जेरुसलेमचा नैसर्गिक भूभागच बदलला गेला. शहरात येणाऱ्या प्रत्येकाला इथल्या शासकांची सत्ता आणि सामर्थ्य दाखवण्याच्या हेतूनेच ही बांधणी करण्यात आली होती.

Archaeological discovery
ताजमहालाच्या तळाशी आहेत 50 विहिरी, तुम्हाला माहितीये यामागील रहस्य!

१९६० च्या दशकात करण्यात आलेलं उत्खनन

हा खंदक पहिल्यांदाच समोर आलेला नाही. १९६० च्या दशकात ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ कॅथलीन केन्यॉन यांनी सिटी ऑफ डेव्हिडमध्ये उत्खनन केलं होतं. त्या वेळेस पूर्वेकडील भागात दगड नैसर्गिक उतारावरून उत्तरेकडे खाली जाताना पाहायला मिळाले होते. त्यांना तो भाग नैसर्गिक दरी असल्याचं वाटलं होतं. पण आता स्पष्ट झालं आहे की, तो प्रत्यक्षात खंदकाचाच एक भाग होता.

Archaeological discovery
Unsolved historical mysteries: इतिहासातील ही ५ रहस्य अजून उलगडलेली नाहीत; काय आहे यामागील गूढ?

जेरुसलेम हे तीन अब्राहमी धर्मांचे यहुदी, ख्रिश्चन आणि इस्लाम पवित्र स्थळ मानलं जातं. हे जगातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक असून ते अनेकदा जिंकले गेलं, नष्ट झालं आणि पुन्हा उभारलं गेलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com