Women Health Tests : प्रत्येक महिलेने वर्षातून एकदा आवर्जून कराव्यात 'या' ६ मेडिकल टेस्ट, आजारांचा धोका वेळीच ओळखा

Woman Annual Health Checkup : महिलांनी वयानुसार आणि आरोग्यस्थितीनुसार नियमित आरोग्य तपासण्या करून घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य तपासण्यांचे वेळापत्रक ठरवावे.
Woman Annual Health Checkup
Women Health TestsAI PHOTO
Published On: 
Summary

रक्तदाब तपासणीमुळे उच्च रक्तदाबाचा धोका ओळखता येतो.

रक्तातील साखरेची तपासणी मधुमेहाचे निदान करण्यास मदत करते.

कोलेस्ट्रॉल टेस्टमुळे हृदयविकाराचा धोका समजण्यास मदत होते.

महिलांमध्ये घर, कुटुंब, नोकरी आणि इतर जबाबदाऱ्या सांभाळताना अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते. सुरुवातीला कोणतीही लक्षणे जाणवत नसल्यामुळे काही आजार शरीरात हळूहळू वाढत राहतात. उच्च रक्तदाब, मधुमेह, थायरॉईडचे विकार आणि हृदयविकार यांसारख्या समस्या वेळेत लक्षात आल्या नाहीत, तर पुढे गंभीर स्वरूप धारण करू शकतात.त्यामुळे महिलांनी नियमित आरोग्य तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे.

रक्तदाब तपासणी (Blood Pressure Test)

रक्तदाब वाढल्यास हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. नियमित तपासणीमुळे उच्च रक्तदाब वेळीच लक्षात येतो.

रक्तातील साखरेची तपासणी (Blood Sugar Test)

मधुमेह हा महिलांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा चिंतेचा विषय आहे. विशेषतः गर्भावस्थेत मधुमेह झाला असल्यास भविष्यात टाइप २ मधुमेहाचा धोका वाढू शकतो.यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने खालील तपासण्या करता येतात. उदा. फास्टिंग ब्लड शुगर, HbA1c टेस्ट, ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट

Woman Annual Health Checkup
Weight Loss Tea : वजन कमी करण्यासाठी 'हा' गुलाबी चहा ठरतो फायदेशीर, रोज सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने पोटीची ढेरी होईल गायब

कोलेस्ट्रॉल तपासणी (Lipid Profile Test)

कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे हृदयविकार आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित समस्यांचा धोका वाढू शकतो. महिलांमध्ये रजोनिवृत्तीनंतर कोलेस्ट्रॉलच्या पातळीत बदल होऊ शकतात.

गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची तपासणी (Pap Smear / HPV Test)

महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग म्हणजेच सर्व्हायकल कॅन्सर हा महत्त्वाचा आरोग्यविषय आहे. सुरुवातीच्या टप्प्यात अनेकदा लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे नियमित स्क्रीनिंग आवश्यक आहे. दोन महत्त्वाच्या तपासण्या पॅप स्मिअर टेस्ट आणि HPV टेस्ट आहे.

स्तनाच्या कर्करोगाची तपासणी (Breast Cancer Screening)

स्तनांमध्ये गाठ जाणवणे, स्तनाग्रातून स्त्राव येणे, त्वचेवर बदल दिसणे किंवा स्तनाच्या आकारात अचानक बदल होणे ही लक्षणे दुर्लक्षित करू नयेत.क्लिनिकल ब्रेस्ट एक्झामिनेशन, आवश्यकतेनुसार सोनोग्राफी आणि मॅमोग्राफी या तपासण्या कराव्यात.

हाडांची घनता तपासणी (Bone Density Test)

वाढत्या वयानुसार महिलांच्या हाडांची घनता कमी होण्याचा धोका असतो. विशेषतः रजोनिवृत्तीनंतर इस्ट्रोजेन हार्मोनची पातळी कमी झाल्यामुळे ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढू शकतो. हाडांची घनता तपासण्यासाठी DEXA किंवा DXA स्कॅन केला जातो.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.