
बऱ्याच जणांना तंबाखू खाण्याचे व्यसन अनेक वर्षांपासून असते. तंबाखू खाताना तो पानासोबत किंवा इतर अम्ली पदार्थांसोबत सेवन केला जातो. हे पदार्थ तोंडात अधिककाळ ठेवून चघळलले जातात. मात्र या सवयीमुळे अनेकांना 'ओरल कॅन्सर'सारख्या मोठ्या जीवघेण्यासाठी आजाराला सामोरे जावे लागते. याचा परिणाम आपल्या शरीरावर लगेच दिसून येत नाही. सुरुवातीला ५ संकेत मिळतात. त्याचे प्रमाणात हळहळू वाढत जाते आणि तुम्हाला तोंडाचा कर्करोग होतो. पुढे आपण याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
तंबाखूचा वापर धूम्रपानातून असो किंवा गुटखा, पानमसाला, सुंठ यांसारख्या चघळण्याच्या पदार्थातून केला जातो. हे पदार्थ आजही जगभरात तोंडाच्या कॅन्सरचे सर्वात मोठे कारण मानले जाते. धोका माहीत असूनही अनेक लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. तोंडाचा कॅन्सर सुरुवातीला सामान्य लक्षणांमधून सुरू होतो. ही लक्षणं इतकी किरकोळ असतात की लोक त्यांना गंभीर समजत नाहीत आणि त्यामुळे आजार पुढे वाढत जातो. त्यामुळेच या आजाराचं वेळेत निदान होणं फार महत्वाचं आहे.
तज्ज्ञ सांगतात की, तोंड, ओठ किंवा घसा यामध्ये दिसणारी काही लक्षणं जर दीर्घकाळ टिकून राहिली, तर ती गंभीर आजाराची संकेत असू शकतात. सामान्य आजारासारखी वाटणारी लक्षणं दुर्लक्षित केल्यास ती पुढे जीवघेणी ठरू शकतात.
कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं
दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ न बरी होणारी जखम किंवा जखमेच्या स्वरूपाचा व्रण हा कॅन्सरचा इशारा असू शकतो. दुसरे म्हणजे हिरड्यांवर, जीभेवर किंवा गालांच्या आतील भागावर लाल किंवा पांढरे डाग दिसणे. हे साधे असू शकतात, पण टिकून राहिले किंवा जाडसर झाले तर ते धोक्याचं लक्षण आहे. तिसरे लक्षण म्हणजे घशात गिळताना त्रास होणे किंवा सतत काहीतरी अडकले असल्यासारखं वाटणं. हे घशात किंवा तोंडाच्या मागच्या भागात झालेल्या गाठीमुळे होऊ शकतं. चौथे लक्षण म्हणजे जीभ, ओठ किंवा जबड्यात कारण नसताना होणारी मुंग्या येणं किंवा वेदना. हे मज्जातंतूवर परिणाम झाल्याचं लक्षण असू शकतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.