Benefits Of Chikoo : सकाळी रिकाम्या पोटी खा चिकू, आरोग्याला मिळतील असंख्य फायदे

Eat Chikoo In Morning : सकाळी उठल्यानंतर आपण सर्वात आधी चहा-कॉफीचे सेवन करतो. जर तुम्हालाही निरोगी राहायचे असेल तर दैनंदिन दिनर्चेयत काही महत्त्वपूर्ण बदल करायला हवे. जर सकाळी रिकाम्या पोटी चिकू खाल्ले तर आरोग्याला अनेक फायदे होतात.
Benefits Of Chikoo
Benefits Of ChikooSaam Tv

Healthy Benefits Of Chikoo :

सकाळी उठल्यानंतर आपण सर्वात आधी चहा-कॉफीचे सेवन करतो. जर तुम्हालाही निरोगी राहायचे असेल तर दैनंदिन दिनर्चेयत काही महत्त्वपूर्ण बदल करायला हवे. जर सकाळी रिकाम्या पोटी चिकू खाल्ले तर आरोग्याला अनेक फायदे होतात.

रिकाम्या पोटी चिकू खाल्ल्याने मेंदूसाठीच नाही तर पोटाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. चिकूचे नियमितपणे सेवन केल्याने हाडे मजबूत होण्यासोबतच रोगप्रतिकारशक्ती वाढते, रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि लठ्ठपणाच्या समस्येपासून मुक्त होण्यास मदत होते.

चिकूमध्ये प्रथिने, व्हिटॅमीन (Vitamins) सी, व्हिटॅमिन बी, ई, फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. यामध्ये अँटीऑक्सिंडट गुणधर्म रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतात. तसेच कॅन्सरसारख्या (Cancer) गंभीर आजाराचा (Disease) धोकाही कमी होतो. जाणून घेऊया सकाळी रिकाम्या पोटी चिकू खाण्याचे फायदे.

1. पचनशक्ती सुधारते

चिकूमध्ये आढळणारा फायबर आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. तसेच पचनसंस्था निरोगी राहते.

Benefits Of Chikoo
Jaggery Benefits : रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी करा गुळाचे सेवन

2. हाडे मजबूत होतात

रिकाम्या पोटी चिकू खाल्ल्याने कॅल्शियम आणि इतर पोषक तत्व मिळतात. ज्यामुळे हाडे मजबूत होतात. तसेच लहान मुलांना चिकू खाऊ घातल्याने त्यांच्या आरोग्यासाठी फायदा होतो.

3. प्रतिकारशक्ती वाढते

चिकूमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्व असतात ज्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

4. वजन कमी करण्यास फायदेशीर

चिकूमुळे वजन कमी करण्यास मदत होते. यात असणारे फायबर आरोग्यासाठी चांगले असतात. रिकाम्या पोटी खाल्ल्याने वजन कमी करण्यास मदत होते.

Benefits Of Chikoo
Hydrate Drink : उन्हाळ्यात रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवायचीये? या ड्रिंक्सचा करा समावेश

5. कर्करोगाचा धोका कमी

चिकूमध्ये कॅन्सर विरोधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. याचे सेवन केल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो. हे स्तनाच्या कर्करोगाच्या पेशी वाढवण्यापासून रोखते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com