हात आणि नखांमधील 5 बदल देतात गंभीर आजारांचे संकेत; दुर्लक्ष करणे ठरू शकते धोकादायक

तुमच्या हातावरील आणि नखांमधील होणारे बदल आरोग्याचे गंभीर संकेत देतात . हातावरील नखांवर दिसणाऱ्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका, कारण ही लक्षणे शरीरात पोषणाची कमतरता सहजतेने दर्शवतात.
5 Warning Signs in Hands and Nails That Reveal Serious Health Issues
5 Warning Signs in Hands and Nails That Reveal Serious Health Issuessaam tv
Published On: 

शरीरात आवश्यक पोषणाची कमतरता अनेक समस्यांना आमंत्रण देतात . या कमतरतांकडे दुर्लक्ष केल्यास विविध आजार जडू शकतात. काही जीवनसत्त्वे आणि खनिजांच्या कमतरतेमुळे सुरुवातीला कोणतीही मोठी समस्या जाणवत नाही, परंतु शरीर याचे संकेत नक्कीच देते. जर तुम्ही हाताच्या तळव्यांवरील त्वचा आणि नखांचे बारकाईने निरीक्षण केले, तर खालील ५ बदल सहज लक्षात येतील. या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. कारण ही लक्षणे जीवनसत्त्वांची कमतरता, लोहाची कमतरता आणि डिहायड्रेशन यांसारख्या समस्या दर्शवतात.

बोटांच्या सांध्यांचा भाग काळा पडणे

जर तुमच्या हाताच्या वरचा भाग, म्हणजेच बोटांच्या सांध्यांवर काळे डाग किंवा गडद काळे रंग डाग दिसत असतील, तर हा व्हिटॅमिन बी-१२ च्या कमतरतेचा संकेत असू शकतो. शरीरात व्हिटॅमिन बी-१२ च्या कमतरतेमुळे इतरही अनेक लक्षणे दिसतात, परंतु जर हाताची नखे काळे पडत असतील, तर व्हिटॅमिन बी-१२ ची पातळी नक्की तपासून घ्यावी. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या अहवालानुसार, ही व्हिटॅमिन बी-१२ च्या कमतरतेची खूण आहे.

5 Warning Signs in Hands and Nails That Reveal Serious Health Issues
Medicine Safety : मुदत संपलेली औषधं घेताय? आरोग्यासाठी ठरू शकतं अत्यंत धोकादायक

नखे कोरडी पडणे आणि तुटणे

तुमची नखे जर अतिशय कोरडी, निस्तेज दिसत असतील आणि वारंवार तुटत किंवा मधोमध चिरा पडत असतील, तर सामान्यतः लोक कॅल्शियमची पातळी तपासतात. परंतु, जर नखे कमजोर होऊन तुटत असतील, तर सर्वात आधी आपल्या शरीरातील लोहाची पातळी तपासावी. शरीरात लोहाचे प्रमाण कमी असल्यास नखे पूर्णपणे पांढरी दिसतात, त्यात जराही लालसरपणा नसतो. याचे कारण म्हणजे शरीरातील हिमोग्लोबिन आणि ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यामुळे नखे कमजोर होतात आणि तुटू लागतात.

हाताची त्वचा सैल पडणे

हाताच्या मागची त्वचा जर सैल पडली असेल आणि ओढल्यास सहजासहजी ताणली जाते व ताबडतोब पूर्ववत होत नाही, तर हे शरीरात पाण्याची कमतरता असल्याचे लक्षण असू शकते. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास त्वचा सैल पडते. साधारणपणे असे मानले जाते की कोलेजन आणि इलास्टिनच्या कमतरतेमुळे किंवा वाढत्या वयामुळे त्वचा सैल होते, परंतु शरीराला पुरेसे पोषण आणि हायड्रेशन न मिळाल्यासही त्वचा सैल पडू शकते.

5 Warning Signs in Hands and Nails That Reveal Serious Health Issues
Rat Control Tips : उंदरांचा सुळसुळाट झालाय का? न मारता घरातून बाहेर काढण्याचे सोपे आणि प्रभावी उपाय जाणून घ्या

हाताच्या बोटांमध्ये सूज आणि वेदना

जर हाताच्या बोटांमध्ये सूज आणि हलक्या वेदना जाणवत असतील, तर हे संधिवाताचे लक्षण असू शकते. शरीराच्या अतिशय लहान सांध्यांमध्ये जर वेदना होत असतील, तर याकडे दुर्लक्ष करू नका. अशा वेळी आपल्या आहारात कॅल्शियम आणि व्हिटॅमिनचे प्रमाण तातडीने सुधारण्याची गरज असते.

नखांचा रंग बदलणे व पिवळी पडणे

जर नखांचा रंग पिवळा, मळका दिसू लागला आणि नखे खराब होत असतील, तर अनेकदा हे फंगल इन्फेक्शनचे लक्षण असते.

टीप: या लेखात दिलेली माहिती केवळ सामान्य माहितीसाठी आहे. आरोग्याशी संबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com