Paratha Recipe : पराठा एक चव अनेक! मुलांच्या डब्यासाठी झटपट बनणारा पौष्टिक पदार्थ, पटकन नोट करा रेसिपी

Lunch Box Recipes : मुलांना पौष्टिक आणि भरपेट लंच बॉक्स देण्यासाठी पराठ्याची हेल्दी रेसिपी फॉलो करा. तुमच्या मुलांचा डबा अवघ्या ५ मिनिटांत फस्त होईल आणि त्यांचे पोट देखील दीर्घकाळ भरलेले राहील.
Lunch Box Recipes
Pratha RecipeSAAM TV
Published On

महिलांना रोज 'मुलांच्या डब्याला पौष्टिक काय खायला द्यावे?' हा प्रश्न पडतो. आपण कांदे पोहे, चपाती भाजी, सॅन्डविच, पराठा असे विविध पदार्थ बनवून देतो. पण मुलांना रोज जेवणात एक नवीन चव हवी असते. त्यासाठी आज आपण अनेक चव असलेला हेल्दी पराठा बनवायला शिकूया. तुमच्या मुलांना हा पदार्थ खूप आवडेल. त्यांना एकाच वेळी चार वेगवेगळ्या चव चाखायला मिळतील. सोपी रेसिपी जाणून घ्या..

पौष्टिक पराठा रेसिपी

फोर इन वन पराठा बनवण्यासाठी गव्हाच्या पिठाची कणीक मळून घ्या. कणीक छान मऊ होण्यासाठी त्यात तूप, तीळ आणि थोडी कोथिंबीर घाला. पीठ छान मळून झाल्यावर १० ते १५ मिनिटे ओल्या कापडात ठेवून द्या. आता एका कणकेच्या गोळ्याचा मोठा पराठा बनवून घ्या. त्या गोलाकार चपातीला खालचा बाजूंनी कट करून त्याचे चार समान त्रिकोण तुकडे करून घ्या. पराठ्यामध्ये सर्व स्टफिंग भरून झाल्यानंतर कट केलेला भाग एकावर एक ठेवून पराठा गुंडाळून घ्यावा. हा पराठा तूपात दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या. अशाप्रकारे गरमागरम पौष्टिक पराठा तयार झाला. या पराठ्याचा तुम्ही दही, सॉस, पुदिन्याची चटणी, खोबऱ्याची चटणी, लोणच्यासोबत आस्वाद घ्या.

Lunch Box Recipes
Monsoon Special : पावसाळ्यात चायनिज खाण्याचे क्रेव्हिंग घरबसल्या होईल पूर्ण, डिनरला बनवा रेस्टॉरंट स्टाइल नूडल्स

पराठ्याच्या चार भागाच स्टफिंग कसे तयार करावे?

  • पहिला भाग : पहिल्या भागामध्ये तुम्ही चीज स्लाइस ठेवा.

  • दुसरा भाग :दुसऱ्या भागामध्ये शेजवान आणि मेयॉनीज मिक्स करून लावावे.

  • तिसरा भाग : तिसऱ्या भागामध्ये बटाट्याची भाजी घालावी.

  • चौथा भाग : चौथ्या भागामध्ये पनीर आणि मक्याचे दाणे कुस्करून टाकावे.

Lunch Box Recipes
Crispy Bhindi Recipe : कुरकुरीत मसाला भेंडी 'या' पद्धतीने बनवा; सासरची मंडळी म्हणतील सुगरण आली घरी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com