Crispy Bhindi Recipe : कुरकुरीत मसाला भेंडी 'या' पद्धतीने बनवा; सासरची मंडळी म्हणतील सुगरण आली घरी

Crispy Bhindi Fry Recipe : आज आम्ही तुम्हाला कुरकुरीत भेंडीची भजी कशी बनवायची याची माहिती सांगणार आहोत. भेंडीची भजी बनवणे फार सोप्पे आहे. तसेच या रेसिपीसाठी जास्त वेळ सुद्धा लागत नाही.
Crispy Bhindi Fry Recipe
Crispy Bhindi RecipeSaam TV
Published On

भेंडीची भाजी खाणे अनेक व्यक्तींना आवडत नाही. भेंडी काही प्रमाणात चिकट असते. त्याची भाजी बनवताना आधी यातील चिकटपणा काढून टाकावा लागतो. त्यानंतर याची भाजी बनवली जाते. आता भेंडीची भाजी न आवडणाऱ्या अनेक व्यक्ती आहेत. मात्र भेंडीपासून मिळणारे व्हिटॅमिन आपल्या शरीरात जावेत त्यामुळे काही व्यक्ती भेंडी खातात. अशात आज आम्ही तुम्हाला कुरकुरीत भेंडीची भजी कशी बनवायची याची माहिती सांगणार आहोत.

Crispy Bhindi Fry Recipe
Aluche Fadfade Recipe: रिमझिम पावसात जेवणात बनवा गरमागरम अळूचं फदफदं, सोपी रेसिपी वाचा

साहित्य

भेंडी

बेसन पीठ

तिखट

हळद

मीठ

आमचूर पावडर

जिरे

तेल

कृती

भेंडीची भजी बनवणे फार सोप्पे आहे. तसेच या रेसिपीसाठी जास्त वेळ सुद्धा लागत नाही. ही भजी बनवताना आधी भेंडी पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर या भेंडीचे उभे काप करा. भेंडी आधी उभी चिरून घ्या. त्यानंतर याचा आकार जास्त मोठा असेल तर त्याचे मधोमध दोन भाग करा. भेंडीचे असे मस्त काप करून घ्या.

त्यानंतर यामध्ये तुमच्या आवडीनुसार मीठ, जिरे, तिखट, हळद आणि आमचूर पावडर टाकून घ्या. सर्व मसाले भेंडीमध्ये एकजीव करून घ्या. त्यानंतर यावर थोडं बेसन पीठ टाका. बेसन पीठ अगदी थोडं टाका. भेंडीमध्ये चिकटपणा असल्याने यात पाणी मिक्स करण्याची गरज नाही. पीठ त्यावर छान लागते.

भेंडीवर पीठ टाकल्यानंतर एका काढीत तेल तळण्यासाठी ठेवा. तेल छान तापलं की, पुढे थोडी थोडी भेंडी तेलात फ्राय करा. अशा प्रकारे तुम्ही सर्व भेंडी मस्त तळून घ्या. भेंडी छान फ्राय झाली की कुरकुरीत होते. तसेच याला जास्त तेल लागत नाही. ही कुरकुरीत भेंडी तुम्ही साध्या डाळ भातावर सुद्धा खाऊ शकता.

ही अगदी सिंपल रेसिपी आहे. तुम्ही ही भेंडी नुसती सुद्धा खाऊ शकता. भजी चपाती म्हणून सुद्धा अशी भेंडी टेस्टी लागते. अगदी नवीन जेवण बनवण्यास शिकत असलेल्या मुलींना सुद्धा ही रेसिपी सहज बनवता येते.

Crispy Bhindi Fry Recipe
Cutlet Recipe: घरच्या घरी १० मिनिटांत बनवा चटपटीत वाटाणा- पोह्याचे कटलेट;रेसिपी वाचा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com