Vegetable Price : कोथिंबीर २००, मिरची १२० रुपये किलो; आवक घटल्याने भाज्यांचे दर कडाडले

Parbhani News : यंदा पाण्याची टंचाई असल्याने भाजीपाल्याची जास्त लागवड करण्यात आलेली नव्हती. शिवाय उन्हामुळे बाजारात भाज्यांची आवक कमी होत असते
Vagitable Price
Vagitable PriceSaam tv

परभणी : गत काही दिवसांपासून भाज्यांची आवक मंदावल्याने भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत. मिरची, शेवगा, फुलकोबी, गवार १२० रुपये किलोवर पोहोचली. परिणामी, ग्राहकांना हात आखडता घ्यावा लागत असल्याची स्थिती आठवडे बाजारात दिसून येत आहे.

Vagitable Price
Sambhajinagar Rain : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी; शेतकऱ्यांना दिलासा

यंदा पाण्याची टंचाई असल्याने भाजीपाल्याची जास्त लागवड करण्यात आलेली नव्हती. शिवाय उन्हामुळे बाजारात भाज्यांची (vegetable) आवक कमी होत असते. यंदा हीच परिस्थिती असल्याने बाजारात भाज्यांची आवक मंदावली आहे. शिवाय यंदा अत्यल्प पावसामुळे अनेक शेतकऱ्यांना (Farmer) भाजीपाल्याचे उत्पादन घेता आले नाही. परिणामी, बाजारात भाज्यांचे दर कडाडल्याची स्थिती दिसून येत आहे. जिल्ह्यासह तालुक्यातील आठवडी बाजारात काही भाज्यांनी शंभरी ओलांडली आहे.

Vagitable Price
Shirpur Crime : जन्मदात्याकडून चिमुरडीची हत्या; पोलिसांनी बापाला घेतले ताब्यात

मिरची, शेवगा, फुलकोबी, गवार, शेपू, मेथी, कोथिंबीर या भाज्यांनी शंभरी पार केली आहे. तर पालक, कारले, टोमॅटो, दोडके, भेंडी, बटाटेही भाव खात आहेत. तर कोथंबीरीचे भाव पुन्हा एकदा दोनशे रुपये किलोवर पोहचले आहेत. परिणामी, गृहिणींना भाज्या खरेदी करताना हात आखडता घ्यावा लागत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com