New Year Resolution: नव्या वर्षात व्यक्तीमत्वाचा विकास करायचाय? मग आजपासून करा 'ही' कामे

2024 Resolution: नवीन वर्षात अनेकजण वेगवेगळे संकल्प करत असतात. परंतु संकल्प मोठा घेतल्याने ते पूर्ण होत नाही. त्यामुळे संकल्प पूर्ण करत असताना ते एकदम करण्याचा विचार करू नका. रोज एक काम केलं तर तुमचा नवा वर्षाचा संकल्प पूर्ण होईल.
New Year Resolution
New Year ResolutionCanva
Published On

2024 Resolution Develop Personality:

या नवीन वर्षात रोज योगा करण्याचा संकल्प घ्या. योगामुळे तुमचे वजन कमी होईल आणि मानसिक आरोग्य सुधारेल. योग तुमच्या व्यक्तिमत्वात मोठे बदल घडवून आणेल. तुमच्या स्वभावात, वृत्तीमध्ये आणि शरीरातील उर्जेमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील.(Latest News)

२०२३ चं वर्ष जाण्यास अवघे काही तास बाकी आहेत. अनेकजण नव्या वर्षात नवा संकल्प, नवा निश्चय करत असतात. परंतु बहुतेकांचे संकल्प हे मात्र पूर्ण होत नाहीत. तुम्ही नवीन वर्षात नवा संकल्प करायचा विचार करत असाल तर लक्षात ठेवा हा संकल्प एकदम पूर्ण करण्याचा विचार करू नका. संकल्प केल्यानंतर तुमच्या दैनंदिन जीवनात थोडा बदल करत रहा. रोज एक काम केल्यास तुम्ही आपले व्यक्तीमत्व सुधारू शकता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नवीन वर्ष नव्या अपेक्षा घेऊन येतं असतं. लोकांना नवीन वर्षात त्यांच्या आयुष्यात बदल आणि आनंद हवा असतो. त्यासाठी अनेक प्रकारचे संकल्प आपण घेत असतो. येत्या वर्षभरात हे करायचं किंवा करायचं नाही, असं वचन आपण स्वतःला देत असतो. नवीन वर्षात बहुतेक जण आपल्यातील सुधारणा करण्याचा संकल्प ठेवत असतात. आपले शरीर, आरोग्य आणि तंदुरुस्ती राखण्यासाठी प्रयत्न करतात. हे संकल्प कशा प्रकारे पूर्ण करायचे याचा कानमंत्र आम्ही सांगत आहोत...

दरम्यान २०२४ संकल्पासंदर्भात केलेल्या सर्वेक्षणात बहुतांश लोकांनी फिटनेसला सर्वोच्च स्थान दिलंय. ४८ टक्के लोकांनी शारीरिक आरोग्याला तर ३६ टक्के लोकांनी मानसिक आरोग्याला महत्त्व दिलंय. तर ३४ % लोकांनी वजन कमी करण्याचा संकल्प केलाय. शारीरिक-मानसिक आरोग्य देखील तेव्हाच चांगले राहील जेव्हा शरीर तुम्हाला साथ देईल. वजन आटोक्यात ठेवलं तर आजार टाळता येतात. त्यामुळे वजन कमी करण्याचा संकल्प खूप महत्त्वाचा आहे. नव्या वर्षात तुम्ही दररोज योगासने केली तर तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्वात मोठा बदल होईल.

वजन कमी करणे किती महत्त्वाचे आहे हे एका रिपोर्टात सांगण्यात आले आहे. रिपोर्टनुसार वर्ल्ड ओबेसिटी ऍटलस २०२३ नुसार २०३५ पर्यंत जगातील निम्मी लोकसंख्या लठ्ठपणाची शिकार झालेली असेल. दरम्यान जास्त वजनामुळे हृदयविकार, फॅटी लिव्हर, मधुमेह, उच्च रक्तदाब, संधिवात आणि कर्करोगाचा धोका वाढत असतो. इतकेच नाही तर लठ्ठ असलेल्या लोकांना मृत्यूचा धोका देखील इतरांपेक्षा ९१ % जास्त असतो.

म्हणूनच जगात दरवर्षी ५० लाख मृत्यूंमागे लठ्ठपणा हे कारण आहे. इंडियन अॅकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सने आपल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा करताना लहान मुलांमधील लठ्ठपणा हा दीर्घकालीन आजाराच्या श्रेणीत टाकलाय. दरम्यान नवीन वर्षात तुम्ही व्यक्तीमत्त सुधारणाचा विचार करत असाल तर दररोज एक काम करा. जीवनशैली बदलून तुम्ही तुमचं व्यक्तीमत्त्व सुधारू शकतात. हे करा संकल्प

  • वजना वाढू देऊ नका

  • धुम्रपान सोडून द्या.

  • वेळेवर झोपा आणि पूर्ण ८ तासांची झोप घ्या.

  • नियमित रक्तदाब आणि साखरची तपासणी करा.

  • व्यायाम आणि मेडिटेशन करा.

वजन नियंत्रण कसे कराल

  • लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करा.

  • कॉफी आणि चहा पुन्हा पुन्हा पिऊ नका.

  • भूक लागल्यावर आधी पाणी प्या.

  • खाणे आणि झोपणे यामध्ये ३ तासांचे अंतर ठेवा.

लठ्ठपणा कशामुळे वाढतो

  • खराब लाइफस्टाइल

  • फास्ट फूड खाणं

  • कार्बोनेटेड पेये सेवन केल्याने.

  • मानसिक ताण

  • व्यायाम न करणे

  • औषधांचे दुष्परिणाम

  • झोपेचा अभाव

लठ्ठपणा कमी करण्याचा रामबाण उपाय

  • सकाळी लिंबू पाणी प्या.

  • रात्रीच्या जेवणापूर्वी सॅलड खा

  • रात्री भाकरी आणि भात खाणे टाळावे

  • ७ वाजण्यापूर्वी रात्रीचे जेवण करा

  • खाल्ल्यानंतर १ तासाने पाणी प्या

महिलांनो २०२४ मध्ये कशा राहाल फि

  • शिळे अन्न खाऊ नका

  • नाश्ता करणे आवश्यक आहे.

  • दुपारी विश्रांती घ्या.

  • आजाराकडे दुर्लक्ष करू नका

सकाळी लवकर कसे उठायचे

  • तुमचे वेळापत्रक बनवा.

  • झोपेची वेळ निश्चित करा.

  • रात्री झोपण्यापूर्वी पाणी प्या.

New Year Resolution
New Year 2024 : भारतात नवीन वर्ष एकदा नव्हे तर 5 वेळा साजरे केले जाते! जाणून घ्या कारण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com