World No-Tobacco Day 2023 : तंबाखू व्यसनाविरुद्ध पोलिसांनी घेतली शपथ, रिलायन्स फाउंडेशनतर्फे राबविण्यात आला अनोखा उपक्रम

Tobacco Side Effects : आज जागतिक तंबाखू विरोधी दिन. याविषयी जनजागृती करण्यासाठी रिलायन्स फाउंडेशनतर्फे अनोखा उपक्रम राबविण्यात आला होता.
World No-Tobacco Day 2023
World No-Tobacco Day 2023Saam tv
Published On

H N Reliance Hospital : आज जागतिक तंबाखू विरोधी दिन. या दिवशी अनेक ठिकणी तंबाखूवर आळा कसा घालता येईल, त्याचे व्यसन कसे सोडवता येईल याविषयी जनजागृती करण्यासाठी रिलायन्स फाउंडेशनतर्फे अनोखा उपक्रम राबविण्यात आला होता.

३० मे २०२३ सर एचएन रिलायन्स (Reliance) फाऊंडेशन हॉस्पिटलने तंबाखूचे व्यसन कसे सोडवायचे याबद्दल १०० हून अधिक पोलिसांसाठी कार्यशाळा आयोजित केली होती. जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त त्यांनी याच्या वापराविरुद्ध शपथ घेतली. या उपक्रमाद्वारे, एचएन आरएफएच चे उद्दिष्ट तंबाखूच्या व्यसनाच्या धोक्यांबद्दल जागरूकता पसरवणे आणि तंबाखूच्या सेवनाविरूद्ध प्रतिज्ञा करणे, निरोगी आरोग्य आणि कर्करोगमुक्त (Cancer) जीवनाकडे एक पाऊल पुढे टाकायचे आहे.

World No-Tobacco Day 2023
World No Smoking Day : निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली ! या गोष्टींची काळजी घेतल्यास धुम्रपानला घालता येईल आळा

1. भारतातील आकडेवारी

भारतात (India), सुमारे २८.६% प्रौढ लोक तंबाखूचा वापर करतात. ही चिंताजनक आकडेवारी देशातील तंबाखूशी संबंधित कर्करोगामध्ये परावर्तित करते. भारतात, फुफ्फुस, डोके आणि मानेच्या कर्करोगासह, कर्करोगाच्या जवळजवळ ५०% प्रकरणांसाठी तंबाखूचा वापर जबाबदार आहे, ज्यामुळे कर्करोगाशी संबंधित मृत्यूचे प्रमुख कारण बनते.

2. कशी घेतली शप्पथ

प्रतिज्ञा कायम राखण्यासाठी करण्यासाठी पोलिसांनी रुग्णालयात तयार केलेल्या प्रतिज्ञा भिंतीवर पेंटमध्ये बुडवलेले हाताचे ठसे उमटवले. ही कार्यशाळा डॉ. सुरेश अडवाणी, मार्गदर्शक, डॉ. विजय हरिभक्ती, संचालक ऑन्को सायन्सेस, डॉ. सेवंती लिमये, संचालक, मेडिकल ऑन्कोलॉजी आणि प्रिसिजन ऑन्कोलॉजी आणि डॉ. प्रसाद दांडेकर, रेडिएशन ऑन्कोलॉजी प्रमुख यांनी घेतली. तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या आजारांवर लक्ष केंद्रित केले गेले आणि तंबाखूच्या सेवनाचे दुष्परिणाम, सोडण्याचे मार्ग आणि भावी पिढ्यांना या सवयीपासून परावृत्त करण्यावर शिक्षित आणि प्रकाश टाकणे यावर लक्ष केंद्रित केले.

World No-Tobacco Day 2023
Smoking Side Effects : फक्त सिगारेटच नाही तर त्याचा धूरही ठरु शकतो घातक !

सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलचे सीईओ डॉ. तरंग ग्यानचंदानी म्हणाल्या, आम्ही सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये ऑन्कोलॉजीसह काळजी घेण्यासाठी वचनबद्ध आहोत. या उपक्रमाद्वारे, आम्ही तंबाखूच्या वापराला निर्बंध घालून त्याची अधिक जागरूकता करण्यासाठी कर्करोग प्रतिबंधास प्रोत्साहन देण्यासाठी एक प्रभावी पाऊल उचलण्याची आशा करतो.

World No-Tobacco Day 2023
Habit Of Smoking : मुझे तो तेरी लत लग गई... टेन्शन आल्यावर तुम्हालाही स्मोकिंग करण्याची सवय आहे? या टिप्स फॉलो करा

आपल्या शहरातील पोलीस कर्मचार्‍यांच्या कार्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि आज त्यांनी सहभागी घेतल्याने आम्हाला अभिमान वाटत आहे. तंबाखूच्या वापराच्या धोक्यांवर जास्तीत जास्त लोकांना शिक्षित आणि सक्षम करण्यासाठी आम्ही आमचे उपक्रम सुरू ठेवू; कारण प्रतिबंध हीच चांगल्या आणि निरोगी समाजाची गुरुकिल्ली आहे.

3. मुंबई पोलीस उपायुक्त मांडले आभार

डॉ. मोहित गर्ग (IPS) पोलीस उपायुक्त झोन २ मुंबई, म्हणाले, कायदेशीरपणे नागरिकांचे गुन्हेगारीपासून संरक्षण करणे आणि देशाचे निरीक्षण करणे हेच आम्ही कायद्याची अंमलबजावणी करणारे पोलीस म्हणून प्रयत्नशील आहोत. चांगले आरोग्य राखल्याने आम्हाला राष्ट्रासाठी आमची दृष्टी वाढवता येईल. आपल्या अस्तित्वात अडथळा आणणारी एखादी गोष्ट सोडवण्यात सक्षम होण्यासाठी कठीण असले तरी खूप आवश्यक आहे. माझ्या अधिकार्‍यांना चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळावे यासाठी सर एचएन रिलायन्स सोबत पार्टनरशीप केल्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com