Puran Poli Recipe: महाराष्ट्राची फेमस पुरणपोळी न फुटता कशी बनवायची; गृहिणींसाठी खास टिप्स

Maharashtrian Special Puran Poli Recipe in Marathi: पुरणपोळी बनवताना कधी पुरण जाड राहतं तर कधी पोळी करपते किंवा कच्ची राहते. त्यामुळे आज परफेक्ट पुरणपोळी नेमकी कशी बनवायची याची रेसिपी जाणून घेऊ.
Puran Poli Recipe
Puran Poli RecipeSaam TV

महाराष्ट्रात सणासुदीच्या दिवशी प्रत्येक घरात पुरणपोळी हमखास बनवली जाते. मात्र अनेक महिलांना पुरणपोळी हवी तशी बनवता येत नाही. पुरणपोळी बनवताना कधी पुरण जाड राहतं तर कधी पोळी करपते किंवा कच्ची राहते. त्यामुळे आज परफेक्ट पुरणपोळी नेमकी कशी बनवायची याची रेसिपी जाणून घेऊ.

Puran Poli Recipe
Puran Poli Tips: पुरणपोळ्या सारख्या फुटतात? मग या सोप्या टिप्स वापरा, एकही पोळी फुटणार नाही

पुरणपोळी बनवताना अनेक महिलांना पोळी तब्यावर टाकल्यावर फुटणे. लाटत असताना पोळी पोळपाटाला चिकटून राहणे अशा समस्या जाणवतात. किंवा पुरण अगोड होतं. यासाठी पीठ, मीठ,पाणी, गुळ यांचं योग्य प्रमाण समजायला हवं.

साहित्य

चणा डाळ 1 कप

किसलेला गूळ 1 कप

मैदा 1 कप

तेल 7 ते 8 टे. स्पून

वेलची पूड 1 टी स्पून

मैदा

कृती

तुम्ही जितकी चणाडाळ घेतली आहे त्याच्या अडिच पट पाणी कुकरमध्ये टाका आणि डाळ चांगली शिजवून घ्या. डाळ शिजल्यानंतर त्यातलं पाणी काढून टाका.

त्यानंतर गुळ बारीक किसून घ्या आणि एक वेलची वाटून घ्या. इथे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गुळ आणि वेलची टाकून डाळ पुन्हा शिजवून घ्या.

गूळ डाळीत पूर्ण मिक्स झाल्यानंतर मिश्रण थोडे थंड करून घ्या. त्यानंतर पुरण यंत्रामध्ये किंवा पाटा वरवंटाने हे मिश्रण बारीक वाटून घ्या.

पुढे पोळीसाठी कनीक मळताना ती जास्त घट्ट मळू नका.

गव्हाच्या पीठात थोडं मैद्याचं पीठ देखील घ्या. त्याने पोळी फाटत नाही.

पिठात थोडं तेल आणि हळद टाकून मळून घ्या. त्यानंतर पीठ १० मिनीटे झाकून ठेवा.

पुढे पोळी लाटून लो टू मिडीअम फ्लेमवर भाजून घ्या.

या चूका टाळा (Avoid These Mistakes)

  • पुरणपोळी बनवताना गॅस कधीच फास्ट करू नका. फ्लेम नेहमी लो टू मिडीअम ठेवा.

  • पुरणपोळीला तूप असल्याने ती गरमागरम एका डब्ब्यात भरून ठेवू नका.

Puran Poli Recipe
Puran Poli: पुरणपोळी खाण्याचे आरोग्यदायी फायदे, तुम्हाला माहिती आहे का?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com