विकसित भारताची निर्मिती कशी होणार? भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी दिला मोलाचा सल्ला

Ravindra Chavan On Viksit Bharat: विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे.
Ravindra Chavan shares his vision for building Viksit Bharat by 2047 during the Samarasta Sankalp Abhiyan.
Ravindra Chavan shares his vision for building Viksit Bharat by 2047 during the Samarasta Sankalp Abhiyan.
Published On

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी २०४७ पर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनवायचे आहे. जाती-धर्माच्या भिंतींपलीकडे जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला समरसतेचा विचार समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे आणि सर्वांनी मिळून राष्ट्रभक्तीचा धागा जपणे आज गरजेचे आहे. ‘समरसता संकल्प अभियान’ ही त्याच व्यापक विचाराची वाटचाल आहे, असं मनोगत भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांनी मांडलेत. रवींद्र चव्हाण हे ‘समरसता संकल्प अभियानांतर्गत कलश यात्रेवेळी बोलत होते.

संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभर ‘समरसता संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत संत रविदास महाराज यांच्या जन्मभूमी वाराणसी येथील पवित्र माती कलशात घेऊन निघालेली कलश यात्रा ७ ऑगस्ट रोजी नागपूर मार्गे छत्रपती संभाजीनगर येथे दाखल झाली. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी या यात्रेचे स्वागत केलं.

त्यावेळी त्यांनी विकसित भारत कसा घडेल, याबाबत आपले मत मांडले. मुकुंदवाडी येथील संत रविदास मंदिरातून या कलश यात्रेला प्रारंभ झाला. त्यानंतर सायंकाळी कासलीवाल मैदान येथे कलश पूजन सोहळा पार पडला. याप्रसंगी संत रविदास महाराज तसेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होत आ. रवींद्र चव्हाण यांनी अभिवादन केले.

यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले, "संत रविदास महाराजांनी जाती-धर्म या व्यवस्थेच्या बाहेर जाऊन समता, बंधुता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश दिला. त्याच विचारांना पुढे नेत समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्याचा संकल्प या अभियानाच्या माध्यमातून करण्यात येत आहे." “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी २०४७ पर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनवायचे आहे.

जाती-धर्माच्या भिंतींपलीकडे जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला समरसतेचा विचार समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे आणि सर्वांनी मिळून राष्ट्रभक्तीचा धागा जपणे आज गरजेचे आहे. ‘समरसता संकल्प अभियान’ ही त्याच व्यापक विचाराची वाटचाल आहे,” असे चव्हाण यांनी सांगितले.

वाराणसी येथून सुरू झालेली ही कलश यात्रा जुलै २०२६ ते फेब्रुवारी २०२७ या कालावधीत विविध टप्प्यांत राज्यभर प्रवास करणार आहे. संत रविदास महाराजांच्या जन्मभूमीची पवित्र माती राज्यातील सर्व जिल्ह्यांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्येक ठिकाणी कलश पूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात येईल. या माध्यमातून संत रविदास महाराजांचा समता, बंधुता आणि सामाजिक एकतेचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा भाजपचा संकल्प आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com