
आपल्यापैंकी अनेकांना जेवणात वाटाण्याची भाजी खाण्यास आवडते.वाटाण्याची भाजी आरोग्यासाठी चांगली असते.
वाटाण्याच्या दाण्याचा वापर केल्यानंतर वाटाण्याच्या साली फेकून दिल्या जातात,मात्र वाटाण्याच्या सालींमध्येही अनेक पोषणतत्त्वे आणि औषधी गुणधर्म आढळतात.
चला तर जाणून घेऊ वाटाण्याचा सालीचा वापर आरोग्याच्या कोणत्या समस्यांमध्ये फायदेशीर ठरु शकतो.
वाटाण्याचा सालीचा वापर केल्याने पचन सुधारण्यास मदत होते,कारण वाटाण्याच्या सालींमध्ये फायबरचे प्रमाण असल्याने ते पचनक्रिया सुरळीत ठवते.
मधुमेहांच्या रुग्णासाठी वाटाण्याचा सालीचा वापर करता येतो.वाटाण्याचा सालीचा वापर करुन रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
हृदयाच्या सर्व समस्यांमध्ये वाटाण्याची साल फायदेशीर ठरते. वाटाण्याच्या सालीत पोटॅशियमचे प्रमाण असते जे हृदयासाठी चांगले असते.
हाडे मजबूतीसाठी कॅल्शियम आणि मॅग्नेशियमची आवश्यकता असते,जे वाटाण्याच्या सालीमध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध असते.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.