दिल दोस्ती दुनियादारी फेम अभिनेता सुव्रत जोशी आणि सखी गोखले ही लोकप्रिय जोडी आहे. या दोघांची लव्हस्टोरी खूपच हटके आहे.
सुव्रत जोशी आणि सखीची ओळख ही दिल दोस्ती दुनियादारी मालिकेच्या सेटवर झाली. त्याआधी ते दोघे फेसबुकवरुन एकमेकांना ओळखत होते.
दिल दोस्ती दुनियादारी मालिकेनंतर ते दोघेही अमर फोटो स्टुडिओ या नाटकात एकत्र काम करत होते.
नाटकात काम करताना त्यांची मैत्री अजूनच वाढत गेली. त्यानंतर त्यांचे प्रेम फुलले.
अमर फोटो स्टुडिओ नाटक संपल्यानंतर सखी ही लंडनला शिकण्यासाठी गेली. या काळात त्यांचं लाँग डिस्टन्स रिलेशनशिप सुरु होते.
याच काळात त्यांच्या नात्याच्या चर्चा सुरु होत्या. परंतु त्यांनी आपले नाते प्रायव्हेट ठेवले. २०१९ मध्ये लग्नगाठ बांधून त्यांनी चाहत्यांना सुखद धक्का दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.