शिवानी सुर्वे ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. शिवानीने अभिनेता अंजिक्य ननावरेसोबत लग्नगाठ बांधली आहे.
शिवानी आणि अंजिक्य एकमेकांना अनेक वर्षांपासून डेट करत होते. त्यांनी तू जीवाला गुंतवावे या मालिकेत एकत्र काम केले होते.
मालिका संपल्यावर या दोघांच्या भेटीगाठी वाढल्या. पुढे त्यांची मैत्री झाली. त्याचं रुपांतर प्रेमात झाले. २०१५-१६ साली त्यांच्या रिलेशनशिपला सुरुवात झाली.
त्यांनी २०१७ मध्ये घरी आपल्या नात्याबद्दल सांगितले. परंतु दोन्ही घरातून त्यांच्या नात्याला विरोध होता.तुम्ही आम्हाला एकत्र राहून दाखवा, मग तुमचं खरं प्रेम आहे की नाही यावर आम्ही विश्वास ठेवू.
त्यानंतर शिवानी आणि अंजिक्य एकत्र राहू लागले. लॉकडाउनमध्ये त्यांच्या घरच्यांना त्यांच्या प्रेमावर विश्वास बसला. तुम्ही लॉक डाउनमध्ये एकत्र राहू शकता तर आयुष्यभर राहू शकता, असं त्यांच्या घरच्यांनी सांगितले.
त्यांनी २०२४ मध्ये आपले नाते अधिकृत करत लग्नगाठ बांधली आहे. हे दोघेही आपापल्या करिअरमध्ये खूप चांगली प्रगती करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.