Ganesh Chaturthi 2024 : गणपती बाप्पाच्या आगमनाने 'या' राशी होणार मालामाल, घरात येणार सुख-समृद्धी

Ganesh Chaturthi 2024 : गणेश चतुर्थीपासून 10 दिवसांचा गणेशोत्सव सुरू होतो. आज गणेश चतुर्थीच्या दिवशी एक-दोन नव्हे तर चार शुभ योग जुळून आलेत.
Ganesh Chaturthi shubh yog
Ganesh Chaturthi shubh yogsaam tv
Published On

गणेशोत्सव हा सण आपल्याकडे मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. अखेर भाविकांना इतक्या दिवसांपासून ज्या दिवसाची उत्सुकता होती, तो दिवस आला आहे. आज गणेश चतुर्थी आहे गणेश चतुर्थीनिमित्त गणरायाचे आगमन झालं आहे. १० दिवस चालणाऱ्या या सणामध्ये गणपती बाप्पाला नैवेद्य अर्पण केले जातात. असंच यंदाच्या गणेशोत्सवात ४ शुभ योग तयार होत आहेत.

गणेश चतुर्थीपासून 10 दिवसांचा गणेशोत्सव सुरू होतो. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीचा जन्म झाला असं मानलं जातं. यंदाचा गणेशोत्सव अनेक शुभ मुहूर्तावर सुरू झाला आहे. आज गणेश चतुर्थीच्या दिवशी एक-दोन नव्हे तर चार शुभ योग जुळून आलेत.

7 सप्टेंबर 2024 रोजी गणेश चतुर्थीला म्हणजेच आज ब्रह्मयोग, रवियोग, इंद्र योग आणि सर्वार्थ सिद्धी योग तयार झाले आहेत. या शुभ योगांमुळे काही राशींना सुख आणि समृद्धी लाभणार आहे. गणपतीच्या येण्याने कोणत्या राशींचे चांगले दिवस सुरु होणार आहेत, ते पाहूयात.

Ganesh Chaturthi shubh yog
Ganesh Puja Niyam: पुजेवेळी चुकूनही गणपतीला अर्पण करू नका 'या' गोष्टी; नाराज होऊ शकतो बाप्पा!

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांसाठी गणेश चतुर्थी खूप शुभ असणार आहे. या व्यक्तींना प्रत्येक कामात यश मिळणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यवसायात यश लाभणार असून पैसा हाती येणार आहे. कामानिमित्त प्रवास करण्याची संधी मिळेल.

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठीही हे योग शुभ ठरणार आहे. या राशींच्या व्यक्तींवर गणपतीची तुमच्यावर विशेष कृपा असू शकणार आहे. करिअरशी संबंधित काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. तुम्हाला संपत्ती आणि मान- सन्मान मिळू शकणार आहे.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांना गणेश चतुर्थी अनेक लाभदायक ठरणार आहे. अचानक तुमच्या उत्पन्नात वाढ होणार असून आर्थिक समस्या दूर होणार आहे. तुमची करिअरमध्ये प्रगती होऊ शकते. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन छान असणार आहे.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. साम या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Ganesh Chaturthi shubh yog
Ganesh Chaturthi 2024 : या गणपतीत घरच्या बाप्पाला दाखवा 'हा' नैवेद्य!

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com