Weekly Horoscope: या राशींवर आठवड्यात कामाचा ताण वाढू शकतो, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

या आठवड्याचे १२ राशींचे सविस्तर राशीभविष्य वाचा. करिअर, आर्थिक स्थिती, नातेसंबंध आणि आरोग्यावर ग्रहांचा कसा प्रभाव राहील ते जाणून घ्या.
Weekly Horoscope
Weekly HoroscopeSaam Tv
Published On

मेष

या आठवड्यात कामात वेग आणि स्पर्धा दोन्ही वाढलेली दिसणार आहे. धाडसी निर्णय घेतल्यास चांगले परिणाम मिळू शकतात. मात्र आर्थिक बाबतीत जोखीम घेण्यापूर्वी सखोल विचार करणं आवश्यक ठरेल.

वृषभ

आर्थिक स्थैर्यासाठी नियोजन महत्त्वाचं ठरणार आहे. घरगुती जबाबदाऱ्या वाढतील पण त्यातून समाधान मिळेल. आरोग्याकडे दुर्लक्ष न करता नियमित दिनचर्या पाळल्यास त्रास टळेल.

मिथुन

संवाद आणि ओळखीमुळे या आठवड्यात नवे मार्ग खुलणार आहेत. नोकरी किंवा व्यवसायात नवीन संधी मिळू शकते. प्रवास किंवा मीटिंगमधून फायदेशीर संपर्क तयार होतील.

कर्क

भावनिक बाबतीत चढउतार जाणवू शकतात. कुटुंबातील विषय शांतपणे हाताळल्यास तणाव कमी होईल.

Weekly Horoscope
Shukra Gochar 2026: १०० वर्षांनी शुक्राच्या गोचरमुळे तयार होणार समसप्तक राजयोग; पैसे मिळवून 'या' राशी जगणार ऐशोआरामात आयुष्य

सिंह

या आठवड्यात नेतृत्व दाखवण्याची संधी मिळेल. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल आणि प्रतिष्ठा वाढणार आहे. टीमसोबत समन्वय ठेवल्यास मोठं काम पूर्ण होऊ शकतं.

कन्या

कामाचा ताण वाढू शकतो पण नियोजन आणि शिस्त यामुळे नियंत्रण राहणार आहे. कागदपत्रे आणि व्यवहार तपासूनच पुढे जा. आरोग्यासाठी झोप आणि आहार सुधारावा लागेल.

तूळ

नातेसंबंध आणि भागीदारीत सुधारणा दिसणार आहे. गैरसमज दूर करण्यासाठी हा आठवडा योग्य आहे. आर्थिक व्यवहारात संतुलित निर्णय घेतल्यास फायदा होईल.

वृश्चिक

संयम आणि गोपनीयता या आठवड्यात तुमची ताकद ठरणार आहे. विरोधक एक्टिव्ह होऊ शकतात, त्यामुळे सावध राहणं गरजेचं आहे.

Weekly Horoscope
Tirgrahi Yog: मकर राशीत बनतोय त्रिग्रही राजयोग; 'या' राशींची धनलाभासह होणार भरपूर प्रगती

धनु

नवीन शिकण्याच्या आणि पुढे जाण्याच्या संधी मिळणार आहे. विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षांसाठी काळ अनुकूल आहे. प्रवासातून अनुभव आणि लाभ दोन्ही मिळतील.

मकर

कामात स्थिर प्रगती आणि जबाबदारी वाढणार आहे. वरिष्ठांचा विश्वास जिंकण्याची करण्याची संधी मिळेल. आर्थिक स्थितीत हळूहळू सुधारणा जाणवेल.

Weekly Horoscope
Kaam Trikon Yog: 18 वर्षांनी बनला काम त्रिकोण योग, 'या' 3 राशींना मिळणार भरपूर पैसा

कुंभ

नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी उत्तम काळ आहे. मित्र आणि नेटवर्कमधून मदत मिळेल.

मीन

मानसिक आणि आध्यात्मिक गोष्टींकडे ओढ वाढणार आहे. भावनिक निर्णय टाळून व्यवहारिक दृष्टी ठेवणं आवश्यक आहे. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मन प्रसन्न राहणार आहे.

Weekly Horoscope
Mahashivratri 2026: महाशिवरात्रीला 300 वर्षांनी बनले 4 राजयोग आणि 12 शुभ योग, 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com