Wednesday Horoscope : जोडीदाराबरोबर दिलजमाई करावी लागेल; 5 राशींच्या लोकांना जपून पावले उचलावी लागणार

Wednesday Horoscope in Marathi : आज काही राशींच्या लोकांना जोडीदाराबरोबर दिलजमाई करावी लागेल. तर काहींना जपून पावले उचलावी लागणार आहे.
horoscope
horoscope in marathi Saam tv
Published On

पंचांग

बुधवार,२६ नोव्हेंबर २०२५, मार्गशीर्ष शुक्लपक्ष,चंपा षष्ठी,मार्तंड भैरवोत्थापन,स्कंद षष्ठी.

तिथी-षष्ठी २४|०३

रास-मकर

नक्षत्र-श्रवण

योग-वृद्धि

करण-कौलव

दिनविशेष-उत्तम दिवस

horoscope
Diwali Lighting Vastu Tips: दिवाळीत लायटिंग लावताय? वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा निवडा

मेष - कर्माचा लेखाजोखा आज बघावा लागेल. "वृत्ती तसे फल देणारा आजचा दिवस आहे. कामाच्या ठिकाणी सकारात्मक परिणाम मिळतील. प्रवास घडण्याचे योग आहेत.

वृषभ - भाग्याला नात्याची जोड असा आजचा दिवस आहे. आपल्या कुटुंबातील लोकांसह मोठे प्रवास होतील. नातवंड सौख्य चांगले असणार आहे. काही सुवार्ता कानी येतील. चंपाषष्ठी निमित्त विशेष दानधर्म करावा.

मिथुन - काही गोष्टी स्वतःसाठी काही दुसऱ्यासाठी करायच्या असतात. आपल्याला आज इतरांसाठी बरेच करावे लागेल मात्र साथ फक्त तुमची तुम्हालाच असेल. मोठे धनप्राप्तीचे योग मात्र आहेत.

कर्क - "अरे संसार संसार" कितीही केले तरी कमी असा दिवस आहे. धावपळ दगदग होईल. कामात विशेष श्रम घ्यावे लागतील. कोर्टाच्या कामात मात्र यश आहे.

सिंह - दिनचर्या डळमळीत राहिल. कामात अपमान सुध्दा होईल.अनेक त्रास सहन करून पुढे जावे लागेल. तब्येतीची काळजी घ्या.

कन्या - आपली सृजनशीलता वाढवण्यासाठी विशेष प्रयत्नांत रहाल. संतती आपल्याला चांगले समाधान देण्याचा योग आहे. कला, क्रीडा क्षेत्रामध्ये घोडदौड होईल. दिवस उत्तम आहे.आज चंपाषष्ठी सुदिन आहे.

horoscope
Vastu Tips: बाथरुममध्ये या वस्तू कधीच ठेवू नका, अन्यथा व्हाल कंगाल

तूळ - सर्व सुखे मिळतील. शेतीची कामे जोमाने होतील. जागा क्रय विक्रय यामध्ये व्यवहार होतील. एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला असेल तर आज तो पूर्ण होईल.

वृश्चिक - श्रम होतील पण यश मिळेल.आपल्या जिद्द आणि चिकाटीने ते खेचून आणाल. मुळात आपली रास फिनिक्स सारखी आहे. "मोडेन पण वाकणार नाही" असेही गुण आहेत.

धनु - गोड खाण्याची इच्छा होईल. कामात वेगळेपण आणण्याचा आज खटाटोप असेल. जोडीदाराबरोबर दिलजमाई करावी लागेल. धनयोग चांगले आहेत.

horoscope
Vastu Tips Of Home Cleaning: रविवारी घराची साफ- सफाई करताय? लादी पुसण्याची योग्य वेळ कोणती?

मकर - मन ध्यानाकडे ओढ घेईल. हा वेगळा आनंद घेण्यात व्यस्त असाल. खरेदी कराल. आपला प्रभाव इतरांवर राहील. दिवस उद्योगात असणारा आहे.

कुंभ - परदेशी प्रवास होईल. मनस्वास्थ्य सांभाळावे लागेल. अध्यात्मात प्रगती होण्यासाठी दिवस चांगला आहे. मोठे प्रवास होतील.

मीन - जेवढे जपाल तेवढा आप्तस्वकीयांशी जिव्हाळा वाढलेला आहे. आता त्या प्रेमाचे फळे चाखण्याचा योग आला आहे. इतर अनेक लाभ होतील. दिवस चांगला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com