Wednesday horoscope : आयुष्यातील अडचणी दूर होणार; ५ राशींच्या लोकांना सुख आणि आनंदाचे दिवस येणार

Wednesday horoscope in Marathi : आज काही राशींच्या लोकांच्या अडचणी दूर होतील. तर काहींच्या आयुष्यात सुख आणि आनंदाचे दिवस येणार आहे.
horoscope in marathi
Horoscope In MarathiSaam tv
Published On

पंचांग

बुधवार,१९ नोव्हेंबर २०२५,कार्तिक कृष्णपक्ष,दर्श अमावास्या.

तिथी- चतुर्दशी ०९|४४

रास-तुला २८|१४ नं. वृश्चिक

नक्षत्र-स्वाती

योग-सौभाग्य

करण-शकुनी

दिनविशेष-चतुर्दशी वर्ज्य

मेष - चरतत्वाची असणारी आपली रास. जोडीदाराबरोबर प्रवासाचे योग दिसत आहे. कोर्टाच्या कामात विशेष यश मिळेल. व्यवसायामध्ये वृद्धी होईल. दिवस चांगला आहे.

वृषभ - अर्थतत्वाला धरून असणारी आपली रास. पैशाला विशेष महत्त्व देते. आज नोकरीच्या ठिकाणी बढती मिळेल. केलेल्या कामाचे श्रेय मिळेल. पण अडचणी सुद्धा उद्भवतील. आपले महत्त्वाचे ऐवज आज सांभाळा.

मिथुन - आपली द्विस्वभाव राशी आहे. प्रेमाच्या बाबतीत योग्य तो निर्णय घेणे आज गरजेचे आहे. नुसते समोरच्याला बोलून आपलेसे करणे हेच पुरेसे नसते. धनयोगाला दिवस चांगला आहे. विष्णू उपासना करावी.

horoscope in marathi
Aadhar card : आधार कार्डावरील नाव किती वेळा बदलू शकतो? ९० टक्के लोकांना उत्तर माहीत नाही

कर्क- जिव्हाळा आणि आपलेपणा घेऊन जपणारी आणि आयुष्य सुखाने घालवणारी आपली रास आहे. घरी पाहुण्यांचे आगमन होईल. व्यवसायाच्या नव्याने वाटा तयार होतील. दिवस चांगला आहे.

सिंह - एखादि मोठी जबाबदारी खांद्यावर येऊन पडेल. पण ती पूर्ण करण्याची ताकद आज आपल्याकडे असेल जवळचे प्रवास होतील. मोठ्या भावंडांचे विशेष सहकार्य आज आपल्याला लाभेल.

कन्या - धनाची आवक जावक चांगली राहील. पैशाचा हिशोब अचूक ठेवला जाईल. कुटुंबीयांच्या बरोबर स्नेहाचे संबंध आज राहतील. त्यांची करारमदार तुमच्यावर असेल.

horoscope in marathi
Lakshmi Photo Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घरात आणि ऑफिसमध्ये माता लक्ष्मीचा फोटो कुठे आणि कसा लावावा?

तूळ - मनस्वी आयुष्य जगावे असे आपल्याला बऱ्याचदा वाटते.पण कामाच्या व्यापामुळे जमत नाही. आज खास करून तुम्हाला या गोष्टींची ओढ वाटेल. नव्याने खरेदी, पैसा जरी खर्च झाला तरी त्यातून आनंद लुटाल.

वृश्चिक - विनाकारण अडचणी समोर उभ्या राहतील. आपल्याविषयी अफवा उठतील. बंधन योग आहेत. परदेशी जाण्याच्या नियोजन आज पार पडेल. एकट्याने अनेक गोष्टी पार पाडाव्या लागतील हे लक्षात घ्या.

धनु - शेजारी सहकार्य लाभेल. जवळचे नातेवाईक मित्रमंडळी यांच्याबरोबर आनंदी क्षण उपभोगाल.जुन्या केलेल्या गुंतवणुकी मधून आज लाभ दिसत आहेत.

horoscope in marathi
Vastu Tips: बाथरुममध्ये या वस्तू कधीच ठेवू नका, अन्यथा व्हाल कंगाल

मकर - समाजसेवा, राजकारण या दोन्हीमध्ये आज चांगली घोडदौड होईल. व्यवसायामध्ये आपल्याला विशेष पद मिळण्याचा संभव आहे. केलेल्या कामाचा चांगला मोबदला मिळाल्यामुळे मन आनंदी राहील.

कुंभ - भाग्याला कलाटणी देणारा आजचा दिवस आहे. नव्याने काही वार्ता कानी येतील. आयुष्य सुकर होण्याच्या दृष्टीने मार्गक्रमण कराल. यासाठी आपल्या सद्गुरूंचा विशेष आशीर्वाद आपल्याबरोबर राहील.

मीन - ठरवलेल्या गोष्टीत अडचणी नाही आल्या तर तो दिवस कसला. आज मात्र अनेक अडचणींचा सामना तुम्हाला एकट्यालाच करावा लागेल. वाईट गोष्टींपासून सावध राहण्याचा आज इशारा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com