Wednesday Horoscope : सर्व लाभ पदरात पडतील; ५ राशींच्या लोकांचे आयुष्य बदलणार

Wednesday Horoscope in Marathi : काही राशींच्या लोकांच्या पदरात सर्व लाभ पडतील. तर काहींचं नशीब खुलणार आहे.
Wednesday Horoscope
Wednesday Horoscope in MarathiSaam tv
Published On

पंचांग

बुधवार,१० डिसेंबर २०२५,मार्गशीर्ष कृष्णपक्ष.

तिथी-षष्ठी १३|४७

रास-सिंह

नक्षत्र-मघा

योग-वैधृति

करण-वणिज

दिनविशेष-वैधृति वर्ज्य

Wednesday Horoscope
Vastu Tips OF Wall Colour: दिवाळीपूर्वीच निघेल 'दिवाळं', चुकूनही घराला देऊ नका हे रंग, वास्तुदोषाचा करावा लागेल सामना

मेष - "प्रेमाला उपमा नाही" असा काहीसा दिवस आहे. समोरच्या व्यक्तीचे मन जाणून आज वागणं गरजेचे आहे. उगाचच अहंकारामुळे नाती दुरावणार नाहीत ना? याची काळजी घ्या. विद्यार्थ्यांना दिवस प्रगतीपथावर नेणारा आहे.

वृषभ - सर्वच गोष्टीत कलासक्त असणारी आपली रास आहे. घरामध्ये नव्याने काहीतरी बदल करण्याचा मानस असेल तर आज पूर्ण होईल. वाहनसौख्य, गृहसौख्य, मातृसौख्य या सर्वांसाठी दिवस चांगला आहे.

मिथुन - लेखक, प्रकाशक, कागद व्यवसायिक, शाई विक्रेते इत्यादी. तसेच छोटे व्यवसाय करणारे सर्व व्यावसायिक यांना आजचा दिवस चांगला आहे. लहान प्रवास होतील. नव्याने परिचय होऊन व्यवसायात वृद्धी होईल.

Wednesday Horoscope
Vastu Tips Of Home Cleaning: रविवारी घराची साफ- सफाई करताय? लादी पुसण्याची योग्य वेळ कोणती?

कर्क - घरी पाहुण्यांचे आगमन होईल. विशेष अगत्य, आदरातिथ्य याच्यामध्ये तुम्ही मग्न असाल. आपल्याच लोकांसाठी करण्यात आपल्याला कोण आनंद होतो. तसेही आपली रास हळवी आणि प्रेमळ रास आहे. आज घरातल्यांसाठी जीव ओतून काम कराल.

सिंह - स्वतःला आवडणाऱ्या गोष्टींना मुरड घालण्याचा आजचा दिवस मुळीच नाही. जे आवडेल ते करा. त्यामधून आनंद लुटाल. तुमचा प्रभाव इतरांवर राहील. तुमचा सकारात्मक स्वभाव इतरांना जगण्यासाठी उर्मी देणारा ठरेल.

कन्या - खर्च झाला याचा त्रास नसतो तर हिशोब लागत नाही याचा त्रास आपल्या राशीला होतो. सर्व व्यवहार बरोबर करण्यामध्ये आपल्या राशीचा हात कोणी धरू शकत नाही. आज या सगळ्याच गोष्टीवर नियंत्रण ठेवणं गरजेचे आहे. अन्यथा मनस्ताप तुमचेच आहेत.

तूळ - स्वार्थापयी कोणत्याही गोष्टी आज करू नका. मैत्रीत सुद्धा निरपेक्ष प्रेम आज देणे गरजेचे आहे. तरच सर्व लाभ तुमच्या पदरात पडतील. पैशाचा अपव्यय न होता गुंतवणुकीतून फायदा होईल.

वृश्चिक - काही झाले तरी आपल्या राशीला कुठेतरी डाग येतोच. न केलेल्या गोष्टींचे खापरही आपल्यावर फुटते. आज मात्र अशा काही गोष्टी होणार नाही तर आपल्या पदरी मान, सन्मान, पत, प्रतिष्ठा येणार आहे.खुश राहा.

धनु - देवाने दिलेल्या गोष्टींविषयी एक वेगळी कृतज्ञता आज जाणवेल. कधीकधी असे वाटेल गरजेपेक्षा अधिकच आपल्याला सर्व छान मिळाले आहे. इतरांना आपल्या आनंदात बरोबर घेऊन जाण्याचा आजचा दिवस आहे.दान, दानत, उदारता वाढेल.

Wednesday Horoscope
Home Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घराच्या दरवाज्यांना कोणता रंग द्यावा?

मकर - हमालकष्ट हा जरी शब्द असला तरी आपल्या राशीला या शब्दाचे वेगळेपण काहीच नाही. शारीरिक नाही तर मानसिक त्रास कुठल्यातरी गोष्टी तुमच्या मागे नेहमीच असतात.अर्थात आज कष्टाला पर्याय नाही आणि एकटेपणाने सर्व करायचे हे मानून पुढे जावे लागेल.

कुंभ - मतामध्ये विरोधाभास असला तरी जोडीदाराबरोबर आज मनभेद होणार नाहीत तर मतभेद होतील. अर्थात सर्व गोष्टी सामोपचाराने संसारासाठी दोघांनी घेणे गरजेचे आहे. कोर्टाच्या कामात, व्यवसायामध्ये सुयश मिळणार आहे.

मीन - संतती काहीतरी चांगल्या बातम्या आज तुम्हाला देणार आहे. त्याबद्दल नक्कीच तुम्हाला अभिमान वाटेल. कला, क्रीडा क्षेत्र यामध्ये प्रगती होईल. काव्यामध्ये सृजनशीलता असेल. दिवस चांगला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com