
बुधवार,६ ऑगस्ट २०२५,श्रावण शुक्लपक्ष,प्रदोष.
तिथी-द्वादशी १४|०९
रास-धनु
नक्षत्र-मूळ
योग-वैधृति
करण-बालव
दिनविशेष-चांगला दिवस
मेष- श्रावण मासाची चाहूल नक्कीच आपल्या ओंजळीत पसाभर सकृत्य टाकेल. प्रवासामधून फायदा होईल. बुद्धीला एक प्रकारची झळाळी येईल. गणेश उपासना आज करावी.
वृषभ - मृत्यू भय विनाकारणच दाटून येईल. ठरलेल्या कामांमध्ये अडचणी येतील. काहीतरी गूढ किंवा वेगळे करण्याचा आज अट्टाहास राहील. गुप्तधनाचे मार्ग सापडतील.
मिथुन - तरुण आणि उमदा भागीदार घेऊन आज नव्याने व्यवसायाची सुरुवात कराल. दिवस चांगला आहे. एकमेकांच्या सल्ल्याने प्रगतीच्या वाटा नक्कीच सापडतील. यश आपली वाट पाहत आहे हे लक्षात असू द्या.
कर्क - खराब पाणी अथवा अन्न यापासून स्वतःची काळजी घ्या. तब्येत बिघडण्याची दाट शक्यता आहे. आपली मानसिकता सुद्धा यावरच अवलंबून आहे. कोणत्याही परिस्थितीत धीरोदत्त राहणे आज गरजेचे आहे.
सिंह - रवी उपासना करावी. कायमच आपण ताठ मानेने राहता आणि जगता. आज मात्र याचे चांगले पडसाद आपल्या आयुष्यात उमटतील. शेअर्समधील गुंतवणूक फलदायी ठरेल. धनयोग उत्तम आहेत.
कन्या - अजूनही कामाला लागले नसाल तर आज पेटून उठा. प्रॉपर्टीशी निगडीत व्यवहार,जमिनीच्या गोष्टी, शेतीवाडी याचे क्रयविक्रय यासाठी व्यवहार करायला आजचा दिवस उत्तम आहे. कौटुंबिक सौख्य चांगले आहे.
तूळ - बहिणीची विशेष माया लाभेल. सुंदर रमणीय वातावरणात जवळच्या ठिकाणी पर्यटनाला जाण्याचे आज योग आहेत. मनोरंजनात्मक गोष्टींमध्ये विशेष सहभाग आज घ्याल.
वृश्चिक - जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. एकटेपण खायला उठेल. कदाचित नकारात्मक गोष्टींनी मन भरलेले राहील. पण जवळची कुटुंबातील व्यक्ती आपल्याला आधार देईल. पैशाची आवक जावक चांगली असेल.
धनु - घोड्याप्रमाणे उमदी असणारी आपली रास. आज नवनवीन गोष्टी यांचे संकल्प करून त्या सत्यात उतरवण्याचा प्रयत्न कराल.आरोग्य उत्तम राहील. दिवसभरात आशादायी घटना घडतील.
मकर : विनाकारण बंधन योग्य तील आपल्याविषयी जवळचेच लोकं भांडं असतील अफवांमध्ये भर पडेल मानसिकता सांभाळावी लागेल एकटेपणाची जाणीव आज वाढीस लागेल
कुंभ - प्रेम करणाऱ्या व्यक्तीचे अस्तित्व जाणवेल. शेजारी संबंध दृढ होतील. मैत्रीपूर्ण घटना आज घडतील. लोकांवरचा विश्वास आपला आज दाट होईल. सुखाची लहरी येईल.
मीन - आपले कार्यक्षेत्र रूंदावणार आहे. कामाच्या ठिकाणी आपली वाहवा होईल. केलेल्या गोष्टीची योग्यता मिळाल्यामुळे नव्याने कामाला आकार येईल. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा मिळवाल. दिवस चांगला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.