Tuesday Horoscope : लक्ष्मीची विशेष कृपा होणार; ५ राशींच्या लोकांची भरभराट होईल, तुमच्या नशिबात काय लिहिलंय?

Tuesday Horoscope in Marathi : आज काही राशींच्या लोकांवर लक्ष्मीची विशेष कृपा होईल. तर काही लोकांची भरभराट होईल. वाचा मंगळवारचं राशीभविष्य
Tuesday Horoscope
Tuesday Horoscope in Marathi Saam tv
Published On

पंचांग

मंगळवार,२१ ऑक्टोबर २०२५,अश्विन कृष्णपक्ष,लक्ष्मी कुबेर पूजन,दर्श अमावस्या, महावीर निर्वाण दिन.

तिथी-अमावस्या १७|५५

नक्षत्र-चित्रा

रास-कन्या ०९|३६ नं तुला

योग-विष्कंभ

करण-नागकरण

दिनविशेष-आनंदी दिवस

मेष - नोकरी व्यवसायामध्ये काहीतरी चांगल्या घटना, घडामोडी घडणारा आजचा दिवस आहे. लक्ष्मीपूजन सार्थकी लागेल. पण त्याचबरोबर हितशत्रूंचा त्रासही संभवत आहे. उष्णतेच्या, पित्ताच्या तक्रारी डोके वर काढतील. काळजी घ्यावी.

वृषभ - कला क्षेत्रामध्ये नशीब आजमावयाला दिवस छान आहे. दिवस धावपळीचा आणि व्यस्त राहील. शेअर्स, लॉटरी, रेस यामधून धन योगाचा संभव आहे. दिवस सुलभ आणि उत्तम आहे. संतती सुवर्ता कानी येतील.

मिथुन - घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील. मनाने ठरवलेल्या गोष्टी आज तशाच होण्यासाठी प्रयत्न कराल. कुटुंबीयांचे सहकार्य मिळेल. जमिनीशी निगडित मोठे व्यवहार आज पार पडतील. आज दिवस चांगला आहे.

Tuesday Horoscope
Diwali Lighting Vastu Tips: दिवाळीत लायटिंग लावताय? वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा निवडा

कर्क - पराक्रम सार्थकी लागेल. लक्ष्मीची विशेष कृपा आज आपल्यावर राहणार आहे आणि जिद्द चिकाटी आणि उमेद यामुळे पुढे जाल. भावंडा सौख्य भरपूर मिळेल. दिवस संमिश्र आहे.

सिंह - देवी लक्ष्मीची कृपा आज विशेष बरसणार आहे. धनाच्या नवनवीन संधी आज उपलब्ध होतील. मोठे व्यवहार पार पडतील. मात्र खात्री शिवाय कोणत्याही ठिकाणी साक्षीदार राहू नका. दिवस चांगला आहे.

कन्या - मनमोर येऊन आज बहरणार आहे. सुखाचा, आनंदाचा शोध घेण्यासाठी विशेष प्रयत्न कराल. आपली मुळातच बुद्धिजीवी असणारी रास पण आज स्वमग्न रहाल. मनस्वास्थ चांगले राहिल्यामुळे सणाचा आनंद पूर्णपणे उपभोगाल.आरोग्य उत्तम राहील.

Tuesday Horoscope
Vastu Tips: आंघोळ न करता जेवण बनवणं अशुभ असतं?

तूळ - काही येणे आणि काही जाणे आयुष्यात चालू राहते. धनाचा व्यय आज दिसतो आहे. पण त्यामधून नवनवीन गोष्टी आज घ्याल असेही वाटते आहे. खरेदीतून आनंद मिळेल. लक्ष्मीपूजन सार्थकी लागल्याचे भावना दिवसाच्या शेवटी होईल.

वृश्चिक- काहीतरी सातत्याने नाविन्याचा शोध आपल्या राशीला आवडतो. व्यवहार जपून करा.आज कामे कराल पण गुढत्वाकडे ओढा राहील . मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांच्या घोटाळ्यात आज दिवस व्यस्त राहील. अनेक लाभ होतील.

धनु - दिवाळीचा बोनस अर्थाशी निगडित आणि कार्याशी निगडित आज आपल्याला मिळेल. केलेल्या गोष्टींचे पूर्ण श्रेय कामाच्या ठिकाणी मिळाल्यामुळे मनस्वास्थ चांगले असेल. आनंदि दिवाळीचे सर्व क्षण आज तुम्ही उपभोगाल .

Tuesday Horoscope
Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये हत्तीची मूर्ती असावी की नाही?

मकर - "जो जे वांछील तो ते लाहो" असा दिवस आहे. यशाची द्वारे सहज उघडणार आहेत. देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर विशेष बरसणार आहे. भाग्याला नवीन कलाटणी मिळेल. दिवस उत्तम आहे.

कुंभ - मोठ्या धन योगाचे लाभ दिसत आहेत. गुप्तधन, काळा पैसा, जोडीदाराकडून विशेष धनयोग आज दिसून येत आहेत. केलेल्या कर्माचे विशेष लाभ दिसून येतील. मात्र काही कामाचा गाडा हा आपल्याला एकट्याला सोडावा लागेल .

मीन - व्यवसायामध्ये "घे भरारी" असा दिवस आहे. व्यस्तता वाढेल. नवनवीन बैठका आणि आयुष्यात नवीन संधीची उपलब्धता असा दिवस आहे. लक्ष्मी कृपा विशेष राहील.त्यामुळे संसारीक सुखामध्ये सुद्धा वाढ होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com