
मंगळवार,९ सप्टेंबर २०२५,भाद्रपद कृष्णपक्ष,द्वितीया श्राद्ध.
तिथी- द्वितीया १८|३०
रास- मीन
नक्षत्र-उत्तराभाद्रपदा
योग-गंडयोग
करण-तैतिल ०७|५३
गरज १८|३०
दिनविशेष-उत्तम दिवस
मेष - आयुष्यात अडचणी ठरवून येत नाहीत. पण आज विशेष काळजी घ्यावी. ते म्हणजे आपल्या वस्तू आणि महत्त्वाचे ऐवज या गहाळ होणार नाहीत ना.. कोणाचेही सहकार्याची आज अपेक्षा नकोच. दुपट जोमाने काम करा.
वृषभ - आयुष्यामध्ये आनंदाचे क्षण तितकेच महत्त्वाचे असतात. अनेक दिवस कामाला वाहून घेतल्यामुळे थोडा निवांतपणा आज मिळेल.आरोग्य उत्तम राहील. मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल.
मिथुन - वक्तृत्वात माहीर असणारी आपली रास. राजकीय क्षेत्रात विशेषत्वाने सहभागी व्हाल. करिअरच्या ठिकाणी नवे दिशा नवे मार्ग मिळतील.दिवस आनंदी जाईल.
कर्क - शिव उपासना आज फायद्याची ठरेल. धार्मिक कार्यामध्ये विशेषत्वाने सहभाग घ्याल . मनाचा कौल लक्षात घेऊन कामे केल्यास यश तुमचेच आहे. यशाचे दारे आपोआप उघडतील.
सिंह - हितशत्रूंचा त्रास संभवत आहे.कदाचित तब्येतीच्या तक्रारी सुद्धा आज वाढतील. अनेक गोष्टी चार डग्रींवर एक पाय केल्यामुळे तारांबळ उडण्याची शक्यता आहे. मात्र अकारण अतिधनाचा मोह नकोच.
कन्या - रखडलेली काम सुरळीत होतील. इतरांवर तुमचा प्रभाव राहील व्यावसायिक क्षेत्र आपले आज व्यापक राहील. जोडीदाराच्या सक्रिय सहभागामुळे उत्साहात भर पडेल.
तूळ - खर्चाचे प्रमाण वाढते राहणार आहे. मात्र एक मनाला आधार म्हणजे कर्मचारी वर्गाचे सहकार्य मिळेल. नोकरीमध्ये प्रगतीचा आजचा दिवस आहे .काळजी नसावी.
वृश्चिक - शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती होईल. पैसा हा प्रत्येकालाच हवा असतो. त्यासाठी आज विशेष कष्ट घ्या. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहिल्यामुळे दिवस उत्तम जाईल. कुलस्वामिनीची उपासना करावी.
धनु - कामानिमित्त प्रवास होतील. कलाक्षेत्रामध्ये सुसंधी लाभेल. कुटुंबीयांच्या बरोबर वेळ काढण्याचा प्रयत्न कराल. वाहन सौख्य उत्तम आहे. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल.
मकर - जिद्द आणि चिकाटीने पुढे जाल. मात्र यामध्ये भावंडांचे नातेवाईकांचे सहकार्य विशेषत्वाने लाभेल. जवळचे प्रवास घडतील. प्रगतीच्या दिशेने आज आपली वाटचाल होईल.
कुंभ - जुनी येणी वसूल होतील. व्यवसायामध्ये नवीन तंत्र आणि मंत्र आज अवलंबाल. धनाची आवकजावक सुद्धा चांगली असल्यामुळे मनस्वास्थ्य सुधारेल. जिभेचे चोचले पूर्ण कराल.
मीन - जे तुम्ही ठरवाल अशी आज कामे होतील. हाती घेतलेल्या कामात यश सुद्धा मिळेल. नियोजित बैठका पार पडतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील दिवस चांगला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.