

मंगळवार,४नोव्हेंबर २०२५,कार्तिक शुक्लपक्ष,वैकुंठ चतुर्दशी.
तिथी-चतुर्दशी १८|४९
रास- मीन१२|३५ नं.मेष
नक्षत्र-रेवती
योग-वज्र
करण-गरज
दिनविशेष-चांगला दिवस
मेष - आपल्या राशीला व्यायातून चंद्राचे भ्रमण होत असल्याने आपली मानसिकता जपावी लागेल. विनाकारण खर्च आणि न केलेल्या गोष्टीच्या कटकटी मागे लागतील. उपासने मधून मार्ग सापडेल.
वृषभ - नव्याने काहीतरी गोष्टीचा संकल्प आज कराल. आपले परिचित स्नेही आणि जिवलगांच्याकडून यासाठी मोठा हातभार केली. आधीच्या केलेले गुंतवणुकी मधून धनलाभ संभावतो आहे.
मिथुन - कर्माचे कार्यकत्व प्रत्येक व्यक्तीला भोगावेच लागते. आपले आज कर्म अनेक चांगल्या गोष्टींच्याकडे घेऊन जाणार आहे.आपले सहकारी आणि वरिष्ठ दोघांच्या कडून केलेल्या कामाची योग्य ती पावती मिळेल. समाजकारणामध्ये रस वाढेल.
कर्क - भाग्यकारक घटना घडण्यासाठी आजचा दिवस अगदीच अनुकूल आहे.काही महत्त्वाचे निर्णय घेतल्यास ते योग्य दिशेने कार्यरत होतील. पौर्णिमेची विशेष उपासना अर्थात शिवपासना आपल्या राशीला फलदायी ठरणार आहे.
सिंह - एखाद्या गोष्टीविषयी पेटून उठणं आणि मन लावून ते काम करणं हे आपल्या राशीला आवडते. परिस्थितीशी दोन हात करणं आणि पुढाकार घेऊन काम करणं हेही आपल्याला सहज जमते म्हणून आज कोणाचेही वाट न बघता नेटाने कामाला लागा.
कन्या - छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणारी आपली रास आहे. घरातील कामांमध्ये रस वाढेल. जोडीदाराच्या भावना जपण्याचा प्रयत्न कराल. त्याचबरोबर दोलायमान अवस्था राहील आणि व्यवसायाविषयी महत्त्वाच्या बैठक्या आणि निर्णय आज पार पडतील.
तूळ - सगळेच दिवस सहज आणि मनासारखे जात असतील तर आयुष्यातला आनंद आपण गमावून टाकतो. आज काही आव्हानात्मक गोष्टींना तुम्हाला सामोरे जावे लागेल. स्वानंद तुम्हाला सापडेल दिवस खडतर असला तरी यशस्वी असेल.
वृश्चिक आज दिवस आनंदाच्या वार्ता घेऊन येणार आहे. धनाची बरसात होईल. कुलस्वामिनीची उपासना फलदायी ठरेल.ठरवाल ते कराल असा आजचा दिवस असणार आहे.
धनु - जमिनीची निगडित व्यवहार, शेतीची कामे यामध्ये आजच्या दिवसात आपल्याला यश मिळणार आहे. वाहन सौख्य उत्तम राहून प्रगती साधणार आहात. नव्याने काही गोष्टींची खरेदी होईल. पौर्णिमा सार्थकी लागेल.
मकर - न बोलता शांततेने काम करणारी आपली रास. आज मात्र आपला पराक्रम अनेक काही गोष्टी बोलून जाणार आहे. इतके की इतर लोकांना आपल्याविषयी मत्सर वाटेल. काम करत राहणे आणि शांतपणे वाटचाल करणे असा आजचा दिवस आहे .पण तुम्ही स्वमग्न असाल.
कुंभ - गुंतवणुकीला दिवस अतिशय सुंदर आहे. बँकांशी निगडित कामे योग्य प्रकारे पार पडतील. व्यवसायामध्ये काहीतरी नवीन घटना घडतील. मात्र इतरांच्या कोणत्याही बाबतीत आज साक्षीदार राहू नका असा आपणास सल्ला आहे.
मीन - "स्वयमेव मृगेंद्रिता" असा काहीसा दिवस आहे. कोणीही आपल्याला आज मागे टाकू शकत नाही. कारण आपली मनस्थिती अतिशय उत्तम राहणार आहे. आरोग्य चांगले राहील.नवनवीन गोष्टींसाठी उत्साहाने भाग घ्याल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.