Tuesday Horoscope : महत्वाची जबाबदारी अंगावर येऊन पडणार; ५ राशींच्या लोकांच्या हातून मोठं काहीतरी घडणार

Tuesday Horoscope in Marathi : काही राशींच्या लोकांना महत्वाची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. तर काहींच्या हातून मोठं काहीतरी घडण्याची शक्यता आहे.
horoscope in marathi
Horoscope In MarathiSaam tv
Published On

पंचांग

मंगळवार,११ नोव्हेंबर २०२५,कार्तिक कृष्णपक्ष.

तिथी-सप्तमी २०|०९

रास-कर्क

नक्षत्र-पुष्य

योग-शुभयोग

करण-विष्टीकरण

दिनविशेष-१२ नं. चांगला

मेष - चंद्र हा मनाचा कारक म्हटला आहे. आज तुमच्या चतुर्थस्थानामधून चंद्राचं भ्रमण मनस्वास्थ्य उत्तम देईल. सर्व सुखांचे आगमन होईल. कशाचीच तूट नाही अशी भावना होईल. घरी पाहुणे येतील.

वृषभ- कामाच्या निमित्त प्रवास होतील. गाड्यांविषयी विशेष प्रेम आणि आकर्षण वाटेल.कलाक्षेत्रात, वक्तृत्व क्षेत्रात, लेखन, प्रकाशन या ठिकाणी आपल्या कर्तुत्वाला उत्तम वाव मिळेल.

मिथुन - आपली रास अल्लड जरी असली तरी व्यवहार उत्तम समजतात. आज व्यवसायाशी निगडित महत्त्वाची कामे होतील. हिशोबाचा चोख लेखाजोखा होईल. घरातील वरिष्ठांच्या सल्ल्याने पुढे जाल.

horoscope in marathi
Home Vastu Tips: घरातील देवघरात 'या' वस्तू ठेवणे टाळावे, अन्यथा...

कर्क - आपला मनोदय हा कायमच चांगला असतो.इतरांना आपल्याकडून कोणी दुखावून जाऊ नये याची तुम्ही नेहमी काळजी घेता किंवा चुकून झाले तर मनाला लागते. आज मात्र स्वतःला जपण्याचा प्रयत्न कराल. खरेदीमध्ये आनंद लुटाल .मनसोक्त जगाल .

सिंह - खोटा मोठेपणा कधी कधी आपल्याला नडतो. कोणाशी कसे वागायचे आज हे अगदी अभ्यासुनच तुम्हाला वर्तन करावे लागेल. चुकीच्या गोष्टींमध्ये अडकू नका. मनस्ताप वाढतील. खर्चावर मात्र नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

कन्या - मित्र-मैत्रिणींमध्ये ऊठबस होईल. आपले सहकारी स्नेहजन यांना बरोबर घेऊन जाण्याचे योग आहेत. काही महत्त्वाच्या कामासाठी आपल्याजवळचे लोक आपल्या सल्ला मागतील आणि त्याचे योग्य समुपदेशन तुम्ही कराल.

horoscope in marathi
Vastu Tips OF Wall Colour: दिवाळीपूर्वीच निघेल 'दिवाळं', चुकूनही घराला देऊ नका हे रंग, वास्तुदोषाचा करावा लागेल सामना

तूळ - आपल्या करिअरमध्ये एक वेगळी उंची आज आपण गाठाल. ठरवलेली काम त्याच पद्धतीने आणि त्याच दिशेने आज होतील. काही मोठ्या जबाबदाऱ्या सुद्धा अंगावर येऊन पडतील. पण न डगमगता त्या तुम्ही पेलाल.

वृश्चिक - कुलस्वामिनीची उपासना आज आपण करावी. त्याचे विशेष फल आपल्याला मिळेल. मनामध्ये नसताना अंदाज नसताना चांगल्या घटना आज घडणार आहेत. आयुष्यामधील या घटना म्हणजे सुखद धक्काच असे म्हणावे लागेल.

धनु - एखादी कोणती तरी मोठी गोष्ट करण्याचे ध्येय अंगी बाळगून आज पुढे जा. कोणी नसले तरी एकटेच यामध्ये सरसावाल. भ्रष्टाचार आणि लाचलुचपत किंवा आपल्याला कोणी साधेपणाने वाईट गोष्टीत अडकवत नाहीये ना याची खात्री करूनच कामे करा.

horoscope in marathi
Vastu Tips For Money: घरात कासवाची मूर्ती ठेवल्याने कोणते लाभ होतात?

मकर - कोर्टाच्या कामामध्ये आज आपण बाजी मारणार आहात. नको असणाऱ्या गोष्टींचा ससेमीरा मागे लागला असेल तर आज त्यामधून सुटका होण्याचे संकेत दिसत आहेत. एखादी चिकाटी आणि ध्येय या उद्देशाने पुढे जाल.

कुंभ - तब्येतीसाठी आजचा दिवस काही संकेत घेऊन आला आहे. हाडांची दुखणे, संधिवात वात विकार यांची आज विशेष काळजी आपल्याला घ्यावी लागेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो आहे.

मीन - प्रेमामध्ये आज आपण बाजी मारणार आहात. अनेक दिवस रटाळ चाललेला दिवस आज अचानक सोनेरी वलय घेऊन येईल. आनंदाला आणि सुखाला पारावर उरणार नाही. मन फुलपाखरू होऊन बागडेल. त्याचबरोबर धनाला सुद्धा दिवस उत्तम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com