आज चंद्र सिंह राशीत; कोणत्या राशींना मिळणार यश आणि कोणासाठी आहे ‘लकी डे’?

आज चंद्र सिंह राशीत प्रवेश करत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, सिंह राशीत चंद्राचा प्रभाव काही राशींना विशेष लाभ देतो. हा दिवस काहींसाठी भाग्यवान ठरणार असून करिअर, प्रेमसंबंध आणि आर्थिक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे.
Zodiac signs getting benefit from Moon
Zodiac signs getting benefit from Moonsaam tv
Published On

आज 11 डिसेंबर 2025 गुरुवारचा दिवस असून हेमंत ऋतूमधील शांत आणि स्थिर ऊर्जा घेऊन आला आहे. आजची तिथी कृष्ण अष्टमी असून चंद्र सिंह राशीत भ्रमण करतेय. कार्यक्षेत्र, मान-सन्मान, कुटुंबीय निर्णय आणि आत्मविश्वास वाढवणारी ऊर्जा आज मिळण्याची शक्यता आहे.

आजचं पंचांग

  • तिथि – कृष्ण अष्टमी

  • नक्षत्र – पूर्व फाल्गुनी

  • करण – बालव

  • पक्ष – कृष्ण पक्ष

  • योग – प्रीति (11:00:32 AM पर्यंत, 12 डिसेंबर)

  • दिन – गुरुवार

सूर्य व चंद्र गणना

  • सूर्योदय – 06:41:30 AM

  • सूर्यास्त – 05:13:24 PM

  • चंद्रोदय – 11:52:23 PM

  • चंद्रास्त – 11:52:14 AM

  • चंद्रराशी – सिंह

  • ऋतु – हेमंत

हिंदू मास व वर्ष

  • शक संवत् – 1947

  • विक्रम संवत् – 2082

  • माह (अमान्ता) – मृगशिरा

  • माह (पूर्णिमान्त) – पौष

अशुभ मुहूर्त

राहुकाल – 01:16:27 PM to 02:35:26 PM

यमघंट – 06:41:30 AM to 08:00:30 AM

गुलिकाल – 09:19:29 AM to 10:38:28 AM

शुभ मुहूर्त

अभिजीत मुहूर्त – 11:36:00 AM to 12:18:00 PM

Zodiac signs getting benefit from Moon
Kendra Yog 2025: 3 सप्टेंबरपासून 'या' राशींना मिळणार प्रत्येक कामात यश; बुध-युरेनस बनवणार पॉवरफुल योग, पैसाही येणार

कोणत्या राशींसाठी आजचा दिवस ठरणार शुभ?

सिंह

आज चंद्र तुमच्या स्वतःच्या राशीत असल्यामुळे आत्मविश्वास, व्यक्तिमत्त्व आणि निर्णयक्षमतेत वाढ होईल. अडकलेली कामे पूर्ण होतील आणि मान-सन्मान वाढण्याची शक्यता आहे.

मेष

आजचा दिवस करिअर आणि व्यवसायासाठी शुभ आहे. वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल आणि प्रलंबित कामांमध्ये गती येईल. आर्थिक लाभाची शक्यता दिसते.

धनु

विद्यार्थी, नोकरी आणि प्रवास करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. चांगली बातमी मिळू शकते किंवा महत्त्वाचे अडथळे दूर होण्याची शक्यता आहे.

Zodiac signs getting benefit from Moon
Guru Gochar: दिवाळीपूर्वी गुरु करणार कर्क राशीत गोचर; 18 ऑक्टोबरपासून 'या' 3 राशींना मिळणार पैसाच पैसा

कुंभ

भाग्य तुमच्या बाजूने राहील. अडकलेली योजना, सरकारी कामे किंवा कागदपत्रांशी संबंधित गोष्टी सहजरीत्या पूर्ण होतील. प्रत्येक कामात यश मिळणार आहे.

Zodiac signs getting benefit from Moon
Chaturgrahi Yog: बुधाच्या गोचरमुळे तयार होणार चतुर्ग्रही योग; या राशींच्या आयुष्यात येणार पैसाच पैसा

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com